एक महिना झाला, ‘ब्लॅक बॉक्स’मध्ये काय होतं हे का कळत नाही? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात तरीदेखील कोणावरती गुन्हे दाखल होत नाहीत. ही बाब अत्यंत चुकीची आणि संतापजनक आहे. एक महिना झाला. विमानाच्या ‘ब्लॅक बॉक्स’मध्ये काय होतं हे कळलं नाही. सीबीआय चौकशीच्या मागणीनंतरदेखील सीबीआय चौकशी का होत नाही, असा सवाल कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतर अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास जलद गतीने झाला नाही. एक महिना झाला. ब्लॅक बॉक्समध्ये काय होतं हे कळलं नाही. नेमकं त्याचं कारण काय हेसुद्धा कळलं नाही. त्यामुळे लोकांची शंका वाढणं आणि सर्वांनीच त्याबाबतची आक्रमकता वाढवणे स्वाभाविकच आहे. रस्ते अपघात झाला तरी गुन्हा नोंदवला जातो, पण उपमुख्यमंत्र्यांच्या निधनाची चौकशी करण्यासंदर्भातील ‘एफआयआर’ नोंदवूनही घेतला जात नाही हे आश्चर्यकारक आहे, असे सपकाळ म्हणाले.

Comments are closed.