वारकऱ्यांना मतदारयादीतून वगळण्यासाठी आषाढी वारी दरम्यान SIRची प्रक्रिया, भाजपने निवडणूक आयोगाशी हातमिळवणी करून घातला घाट; हर्षवर्धन सपकाळांचा आरोप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

वारकऱ्यांना मतदारयादीतून वगळण्यासाठी आषाढी वारी दरम्यान SIRची प्रक्रिया घेण्यात येत आहे. भाजपने निवडणूक आयोगाशी हातमिळवणी करून हा घाट घातल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

महाराष्ट्रात एसआयआरची प्रक्रिया ही नेमकी ज्या दरम्यान दींड्या निघणार आहेत, ज्या दरम्यान महाराष्ट्रातला वारकरी संप्रदायाचाच नव्हे तर महाराष्ट्र धर्माचा जागर करणारा नागरिक हा पालखी सोहळ्यात जातो, पंढरपूरला जात असतात त्याच आषाढ महिन्यात होणाऱ्या वारीच्या पालखी सोहळ्यादरम्यानच एसआयआरची प्रक्रिया ही ठेवलेली आहे. हे सरकारला माहिती नव्हतं का की या दरम्यान महाराष्ट्राताल सर्वात मोठा लोकउत्सव असतो? असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला.

लोक पांडुरंगाच्या दर्शनाकरता वारीत जातात आणि तोच कालखंड हा एसआयआर करता निवडला. याचा अर्थ स्पष्ट आहे की, वारकरी मंडळींना मतदारयादीतून त्यांना वगळायचं आहे. भाविकांना मतदारयादीतून वगळण्याकरता भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाशी हातमिळवणी करून हा घातलेला घाट आहे. आणि हा आम्ही कदापी यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी दिला.

Comments are closed.