महायुती सरकारचे पॅकेज फसवे, हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्ला

जोरदार पाऊस शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने जाहीर केलेले 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज हे फसवे आहे. त्याचप्रमाणे आज मंत्रिमंडळ बैठकीत 11 हजार कोटी रुपयांच्या वितरणाला दिलेली मान्यताही फसवीच आहे, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज हल्ला केला.

नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप व महायुती सरकारवर तोफ डागली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत सपकाळ म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे मतांची चोरी करून मुख्यमंत्री झाले आहेत. खालच्या पातळीवरच्या टीकेने राहुल गांधी यांचे नेतृत्व व कर्तृत्व कमी होत नाही, असे प्रत्युत्तर हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले

दात घशात जातील

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ करा, या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत त्यांचेच दात त्यांच्या घशात जातील, असे सपकाळ म्हणाले.

Comments are closed.