हरियाणा स्फोट : रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट; पोलिसांसह ३५ जण जखमी, कार रस्त्यावर…

हरियाणातील फरिदाबाद कारखान्यात स्फोट
केमिकलच्या ड्रममध्ये भीषण स्फोट झाला
अनेक कर्मचारी आणि पोलीस जखमी झाले
फरीदाबाद: हरियाणा राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. हरियाणाफरीदाबाद येथील एका कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. फरिदाबादच्या सेक्टर २४ मधील कालका येथील रासायनिक कारखान्यात भिषण स्फोट यामध्ये 35 जण जखमी झाले आहेत.
फरीदाबादमध्ये एक केमिकल कंपनी आहे. त्या ठिकाणी मेटल शीट फॅब्रिकेशन केले जाते. त्या ठिकाणी मोठा स्फोट झाला. एकामागून एक केमिकलचे अनेक ड्रम फुटले. आग काही वेळातच परिसरात पसरली. आगीने एवढा भीषण रूप धारण केले की, रस्त्यावरील गाड्याही जळून खाक झाल्या.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत अनेक कर्मचारी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यात ५ पोलीस कर्मचारीही जखमी झाल्याचे समोर आले आहे. या घटनेत 35 जण जखमी झाले आहेत.
हेही वाचा: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री थोडक्यात बचावले..! हेलिकॉप्टर हवेत असंतुलित झालं आणि…, VIDEO आला समोर
जखमींना पुढील उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलीस आणि अग्निशमन दलाने बचावकार्य सुरू केले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आल्याचे समोर आले आहे. आग लागल्याचे समजताच कर्मचाऱ्यांनी वेटिंग एरियाकडे धाव घेण्यास सुरुवात केली.
रासायनिक कारखान्याला भीषण आग
राजस्थानमधील भिवडी औद्योगिक जिल्ह्यात आज (ता. 16) सकाळी भीषण आग लागली. खुशखेडा करौली औद्योगिक परिसरातील एका केमिकल कारखान्याला अचानक आग लागली. आग इतकी मोठी होती की कामगारांना सावरण्याची संधी मिळाली नाही. या हृदयद्रावक अपघातात सात कामगार जिवंत जाळले गेले, तर अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भिवडी केमिकल फॅक्टरीत आग : केमिकल कारखान्यात भीषण आग : सात कामगारांचा होरपळून मृत्यू
काम जोरात सुरू असताना सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा दुर्दैवी अपघात झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भिवडीतील खुशखेडा करौली औद्योगिक क्षेत्रातील केमिकल फॅक्टरीत सुमारे 25 कामगार उपस्थित होते. आग इतकी अचानक आणि वेगाने पसरली की कामगारांना बाहेर पडण्याचा मार्ग सापडला नाही. एडीएम सुमिता मिश्रा यांनी सांगितले की, गस्त सुरू असताना पोलिसांना घटनेची माहिती मिळाली आणि तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.
Comments are closed.