KKR किंवा CSK नाही, IPL 2026 मध्ये संजू सॅमसन खेळणार ‘या’ संघासाठी? इतिहास घडवण्याची संधी!

आयपीएल हंगाम 18 संपल्यानंतर संजू सॅमसन (Sanju Samson) सध्या सर्वात जास्त चर्चेत आहे. रिपोर्ट्सनुसार, संजू सॅमसन आता राजस्थान रॉयल्ससोबत (Rajasthan royals) खेळण्यास इच्छुक नाही. त्यामुळे अनेक फ्रँचायझीज त्याला स्वतःकडे खेळवण्यासाठी तयार आहेत. आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स (KKR)आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांची टीम यामध्ये पुढे होती. आता या रेसमध्ये संजूची जुनी टीम देखील सामील झाली आहे. या फ्रँचायझीमध्ये संजूला कदाचित कर्णधारपद देखील मिळू शकते.

पूर्वी राजस्थान रॉयल्सवर बॅन असताना संजू दोन हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्ससोबत (Delhi Capitals) खेळले होते. न्यूज 24च्या रिपोर्ट्सनुसार, दिल्ली कॅपिटल्स टीम आता संजू सॅमसनला स्वतःकडे खेळवण्याची इच्छा व्यक्त करत आहे. जर संजू पुन्हा ऑक्शनमध्ये उतरले, तर दिल्ली त्यांचा पाठलाग करेल.

दिल्ली कॅपिटल्सने मागील वर्षी मोठे बदल करून अष्टपैलू अक्षर पटेलला (Axar Patel) नवीन कर्णधार बनवले होते. पटेलच्या नेतृत्वाखाली टीमने सुरुवातीला चांगली कामगिरी केली, पण अखेरीस त्यांच्या कामगिरीमुळे फ्रँचायझीला निराशा झाली आणि टीम प्लेऑफच्या रेसमधून बाहेर पडली.

रिपोर्टनुसार दिल्ली कॅपिटल्स IPL 2026 पूर्वी आपला कॅप्टन बदलू शकते. अक्षर पटेल यावेळी फक्त खेळाडू म्हणून खेळेल. संजूची संघात सामील होण्याची चर्चा मोठा संकेत आहे. कदाचित ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्स संजू सॅमसनला विकत घेऊन त्यांच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी देऊ शकते. संजूच्या कर्णधार पदाखालीच राजस्थान रॉयल्सने IPL 2022 मध्ये फाइनलमध्ये प्रवेश केला होता.

Comments are closed.