Asia Cup: मोहसिन नक्वीकडून आशिया कप 2025 ट्रॉफी सुपूर्त? जाणून घ्या मोठा खुलासा समोर!

आशिया कप 2025 स्पर्धेची (Asia Cup 2025) ट्रॉफी घेऊन सुरु झालेला वाद आता संपत चालल्यासारखा दिसत आहे. फायनल संपून २ दिवस झाले आहेत आणि टीम इंडिया भारतात परत आली आहे, पण अद्याप टीम इंडियाला (Team india) ट्रॉफी मिळालेली नव्हती. याबाबत दुबईत झालेल्या आशियन क्रिकेट काउन्सिलच्या (ACC) बैठकीत बीसीसीआयने मोहसिन नक्वीवर (Mohsin Naqvi) जोरदार टीका केली होती. आता मात्र रिपोर्ट समोर येत आहे की, एसीसी आणि पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वीने ट्रॉफी सुपूर्त केली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, एसीसी आणि पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी यूएई क्रिकेट बोर्डकडे आशिया कप 2025 स्पर्धेची ट्रॉफी सुपूर्त केली आहे, ज्यामुळे लवकरच यूएई क्रिकेट बोर्ड ही ट्रॉफी बीसीसीआयला देईल.

मंगळवार, 30 सप्टेंबर रोजी दुबईत झालेल्या आशियन क्रिकेट काउंसिलच्या बैठकीत मोहसिन नक्वी यांना बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajiv Shukla) यांच्याकडून जोरदार टीका सहन करावी लागली. बीसीसीआयच्या मते, टीम इंडियाने आशिया कप 2025 जिंकला आहे आणि ट्रॉफीवर त्यांचा हक्क आहे.

खरं तर, फायनलपूर्वीच टीम इंडियाने ठरवले होते की, ते मोहसिन नक्वी यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारणार नाहीत. टीम इंडिया नक्वी व्यतिरिक्त इतर कोणत्याही अधिकाऱ्याच्या हातून ट्रॉफी घेण्यास तयार होती, पण नक्वीची जिद्द अशी होती आणि नंतर नक्वी ट्रॉफी आणि टीम इंडियाच्या मेडलसह थेट आपल्या हॉटेलकडे निघाले. यावर बीसीसीआयने आपत्ती व्यक्त केली.

Comments are closed.