बर्ड फ्लूचा धोका दिसताच तडकाफडकी निर्णय; हिंदुस्थानसह 40 देशांतील अंडी, चिकनवर सौदीची बंदी

सौदी अरबने हिंदुस्थानसह 40 देशांतील पोल्ट्री प्रोडक्ट म्हणजेच अंडी आणि चिकनच्या आयातीवर बंदी घातली आहे. सौदी फूड अँड ड्रग्ज अॅथोरिटी (एसएफडीए) ने यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. सौदीतील लोकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. अंडी आणि चिकनुळे बर्ड फ्लूचा धोका वाढल्याने चिकन व अंडय़ांना सौदीत नो एण्ट्री करण्यात आली आहे.

सौदीमध्ये 2004 पासून काही देशांतील चिकन आणि अंडय़ांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. आता या देशांसोबत अन्य काही देश नव्याने जोडले आहेत. यात हिंदुस्थानचाही समावेश आहे. सौदीने स्पष्ट सांगितले आहे की, जोपर्यंत पोल्ट्री मांस किंवा त्यासंबंधित उत्पादनाला प्रोसेसिंग केले जात नाही. तोपर्यंत आयातीला सूट दिली जाणार नाही.

कोणकोणत्या देशांचा समावेश

सौदी अर्बाने ज्या 40 देशांवर बंदी घातली आहे, त्यात हिंदुस्थान, अफगाणिस्तान, अझरबैजान, जर्मनी, इंडोनेशिया, इराण, बोस्निया, हर्झगोव्हिना, बल्गेरिया, बांगलादेश, तैवान, जिबूती, दक्षिण आफ्रिका, चीन, इराक, घाना, पॅलेस्टिन, व्हिएतनाम, पांबोडिया, कझाकस्तान, पॅमरून, दक्षिण कोरिया, उत्तर द्या कोरिया, लाओस, लिबिया, म्यानमार, युनायटेड राज्य, इजिप्त, मेक्सिको, मंगोलिया, नेपाळ, नायजर, नायजेरिया, हाँगकाँग, जपान, बुर्किना फासो, सुदान, सर्बिया, स्लोव्हेनिया, हस्तिदंत किनारा आणि मॉन्टेनेग्रो या देशांचा समावेश आहे.

Comments are closed.