श्रीगोंदाचा वीर पुत्र हवालदार गोकुळ वाळके शहीद; चांभुर्डी गावावर शोककळा

श्रीगोंदा तालुक्यातील चांबुर्डी गावचे भूमिपुत्र आणि मराठा लाईट इन्फंट्री युनिट-५ मध्ये कार्यरत असलेले हवालदार गोकुळ नागेश वाळके (वय ३५) हे अयोध्या (उत्तर प्रदेश) येथे कर्तव्य बजावत असताना दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी दुःखदरीत्या शहीद झाले. त्यांच्या अचानक निधनाने चांबुर्डीसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आयोध्या येथे कर्तव्य बजावत असताना भुरळ येऊन पडून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने हवालदार गोकुळ वाळके यांना वीरमरण आले. अल्पवयातच देशसेवेसाठी जीवन वाहिलेल्या या जवानाच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

चांभुर्डी गाव.ता.श्रीगोंदा येथिल शहीद हवालदार गोकुळ वाळके यांच्यावर आज सोमवार, दिनांक ८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी गावामध्ये पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली यामध्ये संपुर्ण गावांतील लहान थोर मंडळी सहभागी झाली होती.यावेळी शहीद जवान गोकुळ वाळके अमर रहे भारत माता की जय जय जवान जय किसान अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. सकाळी ११ वाजता त्यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी लष्कराचे अधिकारी माजी मंत्री बबनराव पाचपुते जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे श्रीगोंद्याचे तहसीलदार सचिन डोंगरे बेलवंडी पोलीस स्टेशनचे सोनवलकर यांच्या सह महिला पुरुष व शालेय विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.सैनिकी सन्मानाने पार पडलेल्या अंत्यसंस्कारावेळी जनसागर उसळला होता. “भारत माता की जय” च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.

त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती सोनाली वाळके , आई,वडील तसेच दोन लहान मुली आरुषी आणि त्रिशा असा परिवार आहे. देशासाठी त्यांचे बलिदान सदैव स्मरणात राहील. वाळके कुटुंबियांच्या दुःखात संपूर्ण तालुका सहभागी असून, या कठीण प्रसंगातून सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो, अशा भावना व्यक्त केली जात आहेत.

Comments are closed.