हरमनप्रीत कौर म्हणते; वर्ल्डकप विजयानंतर आयुष्यच बदलून गेलं, तो शेवटचा चेंडू…

नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील मैदानावर कर्णधार हरमनप्रीत कौर हिने उंची उडी मारून दक्षिण आफ्रिकेची अखेरची बॅटर क्लर्क हिचा झेल घेतला अन् हिंदुस्थानच्या महिला संघाने पहिल्यांदा आयसीसी वर्ल्डकप जिंकला. विश्वविजेत्या होण्याचे महिला संघाचे स्वप्न सत्यात उतरले आणि खेळाडूंसह मैदानावरील प्रेक्षकांनीही जल्लोष सुरू केला. या विजयानंतर आपले आयुष्य बदलून गेले असून तो शेवटचा चेंडू आपण किमान 1000 वेळा तरी पाहिला असेल, असे हरमनप्रीत कौर ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

वर्ल्डकप विजयानंतर माझे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे. मी तो शेवटचा चेंडू किमान हजार वेळा पाहिला आहे. फक्त मीच नाही तर आमच्या संघ अनेक वर्षापासून या क्षणाची वाट पाहत होता. त्यामुळे मला तो क्षण पुन्हा पुन्हा पाहत रहावासा वाटतो, असे हरमनप्रीत म्हणाली.

झेल घेताना मनात काय विचार सुरू होते असे विचारले असता ती म्हणाली की, मला खरेच आठवत नाही की तो झेल घेतानी मी काय विचार करत होते. खरे तर हे शब्दात व्यक्त करणे कठीण असून या विजयाचे महत्त्व माझ्यासाठी खूप आहे. कारण मी नेहमी वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न पाहिले आणि अखेर ते साध्यही केले. आता त्यास दोन आठवडे झाले असले तरी ती भावना खूर खास आहे.

Comments are closed.