तो-मॅन धर्मेंद्र पडद्यामागे

चित्रपटसृष्टीवर शोककळा :  विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

प्रतिनिधी, मुंबई :

प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र (वय 89) यांचे सोमवारी निधन झाले. गेले काही दिवस त्यांची प्रकृती चिंताजनक होती. ‘ही-मॅन’ अशी ओळख असणाऱ्या वीरुच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून त्यांचे चहातेही हळहळले आहेत. दीर्घकाळ ते आजारी होते. मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. तथापि त्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत त्यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आले.

धर्मेंद्र यांना 31 ऑक्टोबर रोजी नियमित तपासणीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 10 नोव्हेंबर रोजी त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना भेटण्यासाठी हेमा मालिनी, सनी देओल, ईशा देओल, करण देओल, राजवीर देओल आणि अभय देओल हे सर्वजण रु ग्णालयात पोहोचले होते.

सहा दशकांची चित्रपट कारकीर्द

‘दिल भी तेरा हम भी तेरे’ चित्रपटातून धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर 1961 मध्ये आलेल्या ‘बॉयफ्रेंड’मध्ये सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत दिसले. आपल्या 65 वर्षांच्या कारकिर्दीत धर्मेंद्र यांनी असंख्य हिट, सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. त्यांनी शोले (1975), चुपके चुपके (1975), सीता और गीता (1972), धरमवीर (1977), फूल और पत्थर (1966), जुगनू (1973) आणि यादों की बारात (1973) अशी त्यांच्या सुपरहिट चित्रपटांची नामावली आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’तील त्यांच्या भूमिकेची खूप चर्चा झाली. 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटातही ते दिसले होते. 89 व्या वर्षीही ते सोनेरी पडद्यावर सक्रिय होते. 25 डिसेंबरला प्रदर्शित होत असलेला ‘इक्कीस’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरणारा आहे. धर्मेंद्र यांची सहा दशकांहून अधिक काळ चाललेली त्याची चित्रपट कारकिर्द खूप मोठी असून लक्षणीय आहे. तसेच 60 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत धर्मेंद्र यांना त्याच्या चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले आहे.

धर्मेंद्रची चित्रपट कारकीर्द

हिंदी चित्रपटसफष्टीतील ‘ही-मॅन‘ धर्मेंद्र यांनी 1960 च्या दशकात चित्रपटसफष्टीत प्रवेश केला आणि आजही ते चित्रपटसफष्टीत सक्रिय आहेत. धर्मेंद्रचा पहिला चित्रपट ‘हकीकत’ हा भारत-चीन युद्धात (1962) सहभागी झालेल्या एका भारतीय सैनिकाची कहाणी सांगतो. या चित्रपटात धर्मेंद्रने सैनिक म्हणून पहिली ऑनक्रीन भूमिका होती. ‘फूल और पत्थर’ (1966)  हा धर्मेंद्रचा पहिला हिट चित्रपट मानला जातो. या चित्रपटाद्वारे त्यांनी अॅक्शन क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटाची नायिका मीना कुमारी होती.  जिच्याशी या अभिनेत्याचेही नाते होते.

सत्यकाम (1969) या चित्रपटात शर्मिला टागोरबरोबर काम केले. या चित्रपटात धर्मेंद्र यांनी एका परिपूर्ण कुटुंबपुऊषाची भूमिका केली होती. ‘मेरा गाव मेरा देश’ (1971) या चित्रपटात धर्मेंद्र यांनी विनोद खन्ना यांच्याबरोबर काम केले. या चित्रपटात धर्मेंद्र आणि विनोद खन्ना पहिल्यांदाच एकत्र आले होते. धर्मेंद्र यांनी चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली होती. ‘सीता और गीता’ (1972) या चित्रपटातही उत्कृष्ट अभिनय केला होता. या चित्रपटात हेमा मालिनी यांनी दुहेरी भूमिका साकारली होती. याशिवाय संजीव कुमारदेखील मुख्य भूमिकेत होते. ‘चुपके चुपके’ (1975) या चित्रपटात धर्मेंद्रने आपल्या विनोदाने प्रेक्षकांना हसवले. या चित्रपटात अमिताभ बच्चन, शर्मिला टागोर, जया बच्चन, असरानी आणि ओम प्रकाश देखील आहेत.

माइलस्टोन 'शोले'

धमेंद्र यांना दिगंत प्रसिद्धी देणारा ‘शोले’ (1975)  हा कारकिर्दीतील सर्वात हिट चित्रपट ठरला. यात त्यांनी वीरूची भूमिका साकारली होती. ती खूप गाजली. या चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्रची जोडी अनेकांना आवडली होती. प्रतिज्ञा (1975)मध्ये धर्मेंद्रने खूप मजेदार भूमिका साकारली आहे. ‘चरस’ (1976), ‘धरमवीर’ (1977), ‘अपने’ (2007), हे सुद्धा प्रमुख गाजलेले चित्रपट आहेत.

Comments are closed.