चीनच्या पीएल -15 क्षेपणास्त्राचे त्याचे रहस्य निराकरण होईल

पाकिस्तानच्या एका चुकीमुळे भारताला संधी : अमेरिका, तैवानलाही होणार आनंद

पाकिस्तान आणि पीओकेतील दहशतवादी तळ करण्याच्या भारतीय सैन्याच्या कारवाईनंतर पाकिस्तान दुस्साहस करू पाहतोय. पाकिस्तानने भारताच्या विरोधात ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर केला, परंतु भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तानी हल्ले अपयशी केले आहेत. याचदरम्यान भारतीय अधिकाऱ्यांनी पाकिस्तानातून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांचे अवशेष हस्तगत केले आहेत. यातील सर्वात महत्त्वाचे अवशेष चीनमध्ये निर्मित पीएल-15ई बियॉन्ड व्हिज्युअल  रेंज एअर-टू-एअर मिसाइलचे (बीव्हीआरएएएम) आहेत.

चिनी क्षेपणास्त्र जवळपास पूर्ण अवस्थेत मिळाले आहे. याचा अर्थ भारताला आता या चिनी क्षेपणास्त्राबद्दल अधिक जाणून घेता येणार आहे. पंजाबच्या होशियारपूरमध्ये हस्तगत करण्यात आलेल्या अवशेषांमध्ये अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण गोष्टी मिळाल्या आहेत, यात प्रपल्शन सिस्टीम, डेटालिंक आणि इनर्शियल रेफरेन्स युनिट सामील आहे. आतापर्यंत तीन क्षेपणास्त्रांचे अवशेष हाती लागले आहेत.

पाकिस्तानने या चिनी क्षेपणास्त्राला भारतीय लढाऊ विमानांना लक्ष्य करण्याच्या अयशस्वी प्रयत्नाच्या अंतर्गत डागले होते. सर्वात नवे अवशेष होशियारपूरच्या एका  ग्रामीण क्षेत्रात आढळून आले आहेत. पूर्वीच्या दोन अवशेषांच्या तुलनेत यावेळचे क्षेपणास्त्र अत्यंत पूर्ण अवस्थेत आहे. याच्या मिसाइलचे डिझाइन आणि याच्या  क्षमतेविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळविण्यास मदत होणार आहे. संबंधित अवशेष डीआरडीओकडे पाठविण्यात आले आहेत.

चिनी क्षेपणास्त्रांची कथित क्षमता

पीएल-15ई चीनच्या पीएल-15 क्षेपणास्त्राचे एक्सपोर्ट वर्जन आहे. या क्षेपणास्त्रात ड्युअल पल्स प्रोपेलेंट रॉकेट मोटर आणि अॅक्टिव्ह इलेक्ट्रॉनिकली स्कॅन्ड ऐरे आहे. हे क्षेपणास्त्र मॅक 5 च्या वेगाने 145 किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्याला भेदू शकते. डाटालिंक आणि इनर्शियल रेफरेन्स युनिट क्षेपणास्त्राची अचूक लक्ष्य भेदण्याची क्षमता सुनिश्चित करतात.

Comments are closed.