जियो हॉटस्टार वरती ऐतिहासिक क्षण! भारत-पाकिस्तान सामन्याने गाठला 60 कोटी प्रेक्षकांचा नवा उच्चांक
विराट कोहलीच्या शतकी खेळीने भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्याला अजूनच रंजक बनविले होते. काही काळ फॉर्मच्या बाहेर असलेल्या विराटने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तान विरुद्ध शतकी खेळी केली आहे. विजयी चौकार मारून त्याने आपली शतकी खेळी पूर्ण केली. यादरम्यान जियो हॉटस्टारने व्यूअरशिप रेकॉर्ड बनविला आहे. त्यावेळी ओटीटी प्लॅटफॉर्म ने 60.2 व्यूअरशिप असा रेकॉर्ड बनविला आहे.
जिओ आणि हॉटस्टारच्या विलीनीकरणानंतर, या प्लॅटफॉर्मवर हा पहिलाच भारत-पाकिस्तान सामना होता. सामना दुपारी 2.30 वाजता सुरू झाला आणि प्रेक्षकांची संख्या 6.8 कोटींवर पोहोचली. त्यानंतर, सामना जसजसा पुढे सरकत गेला तसतशी प्रेक्षकांची संख्याही झपाट्याने वाढली. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या डावाच्या शेवटच्या षटकात प्रेक्षकांची संख्या 32.1 कोटींवर पोहोचली.
भारताच्या डावातील दर्शकांची संख्या काही काळासाठी स्थिर झाली होती, परंतु विराट कोहलीचा डाव सुरू होताच ती पुन्हा वाढली. अहवालानुसार, जिओहॉटस्टारवरील दर्शकांची संख्या 60 कोटी ओलांडली तेव्हा विराट कोहलीने चौकार मारून विजय मिळवला आणि त्याचे शतक पूर्ण केले.
आता यजमान पाकिस्तान क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यांना पहिला सामना न्यूझीलंडकडून हरवला होता. आता त्यांच्या आशा बांगलादेशच्या जबरदस्त पुनरागमन आणि न्यूझीलंडला हरवण्यावर आहेत.
भारताचा पुढील सामना 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध आहे. जर भारताने हा सामना जिंकला तर तो गट टप्प्यात गुणतालिकेत प्रथम स्थानावरती राहील. अशा परिस्थितीत, तो उपांत्य फेरीत गट ब मधील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी सामना करेल. गट ब मध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत.
महत्वाच्या बातम्या :
“भारताच्या विजयावर शोएब मलिकने केली पाकिस्तानची चेष्ठा
भारत-पाक क्रिकेट भविष्यवाणी फसली! – IIT बाबांच्या वक्तव्यावर टीकेचा भडिमार.
Comments are closed.