औरंग्याबद्दल आणि छत्रपती शिवरायांबद्दल बोलणारे हे कोण? आदित्य ठाकरे यांनी गद्दार उपमुख्यमंत्र्यांना फटकारले

नागपूरमध्ये दोन गटात हाणामारीची घटना घडली. ही घटना म्हणजे पूर्वनियोजित कट असल्याचा संशयही व्यक्त होत आहे. या मुद्द्यावरून सर्व पक्षांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. महाराष्ट्राचा मणीपूर करण्याचा भाजपचा डाव असल्याचा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी संबोधन दिले. त्यानंतरही गद्दार उपमुख्यमंत्री या विषयावर बोलण्यासाठी उभे राहिले, ते काय बोलणार, वक्तव्यातून लावालावी करण्याचे त्यांचे काम. मात्र, औरंग्याबद्दल आणि छत्रपती शिवरायांबद्दल बोलणारे हे कोण? असा सवाल करत आदित्य ठाकरे यांनी गद्दार उपमुख्यमंत्र्यांना चागंलेच झोडले आहे.
मुख्यमंत्र्यांनंतर आज विधिमंडळात गद्दार उपमुख्यमंत्री बोलायला उभे राहिले, औरंग्यावर बोलायला… त्याच्यावर बोलणारे हे कोण?
तर रायगडच्या पालकमंत्र्यांनी ठेवलेल्या छत्रपती संभाजी महाराजांवरच्या चित्रपटाच्या शो वर बहिष्कार टाकणारे! का? तर ह्यांच्याकडे रायगडचं पालकमंत्री पद आलं नाही…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) मार्च 18, 2025
याबाबत एक्सवर पोस्ट करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनंतर आज विधिमंडळात गद्दार उपमुख्यमंत्री बोलायला उभे राहिले, औरंग्यावर बोलायला… त्याच्यावर बोलणारे हे कोण? तर रायगडच्या पालकमंत्र्यांनी ठेवलेल्या छत्रपती संभाजी महाराजांवरच्या चित्रपटाच्या शो वर बहिष्कार टाकणारे! का? तर ह्यांच्याकडे रायगडचं पालकमंत्री पद आलं नाही म्हणून! जिल्हा कुठला? छत्रपती शिवरायांच्या राजधानीचा, रायगड! चित्रपट कुठला? छत्रपती संभाजी महाराजांवरचा! स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणी कीड, औरंग्याबद्दल आणि छत्रपती शिवरायांबद्दल बोलणार? हे तेच आहेत जे राज्यात द्वेष पसरवून राज्य पेटवू पाहत आहेत! अश्या निर्लज्जांनी आम्हाला शिकवू नये!, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी गद्दारांची सालटी काढली आहेत.
Comments are closed.