“तो मोठा खेळाडू होऊ शकणार नाही!”, आरसीबीच्या खेळाडूने वैभव सूर्यवंशीला सुनावले; राजस्थान रॉयल्समध्ये खळबळ

अतिशय कमी वेळात वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. जागतिक क्रिकेटमध्ये वैभवच्या फलंदाजीची तुलना आता ख्रिस गेलशी होऊ लागली आहे. इतकेच नाही तर, अलीकडेच एका कार्यक्रमादरम्यान वैभवने गेलचा १७५ धावांचा विक्रम मोडण्याबाबतही भाष्य केले आहे. आता सर्वांच्या नजरा आयपीएल २०२६ कडे लागल्या आहेत. गेल्या हंगामात वैभवने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने क्रिकेट विश्वाला थक्क केले होते, त्यामुळे यावर्षी तो कशी कामगिरी करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

​मात्र, आयपीएल सुरू होण्यापूर्वी आरसीबीचा खेळाडू जितेश शर्मा याने वैभव सूर्यवंशीच्या भविष्याबाबत एक मोठे विधान केले आहे. जितेशच्या मते, हा युवा खेळाडू आपल्या कारकिर्दीत कधीही ‘प्रोफेशनल’ बनू शकणार नाही. जितेशचे हे विधान सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एबी डिव्हिलियर्सच्या यूट्यूब चॅनेलवर संवाद साधताना जितेशने वैभवबद्दल एक वेगळा दृष्टिकोन मांडला, जो विशेषतः मैदानाच्या बाहेरील त्याच्या शिस्तीशी संबंधित आहे.

​एकीकडे एबी डिव्हिलियर्सने वैभवच्या प्रगल्भतेचे (Maturity) आणि प्रोफेशनलिझमचे भरभरून कौतुक केले आहे. वैभव हा एक उत्कृष्ट खेळाडू असल्याचे सांगत एबी म्हणाला, “मी त्याला अंडर-१९ दरम्यान पाहिले होते. आयपीएल आणि मोठ्या लीग क्रिकेटचा अनुभव घेतल्यानंतर आपला दर्जा सतत कायम राखणे सोपे नसते. पण वर्ल्ड कपमध्ये तो ज्या पद्धतीने खेळला, त्याने मी खूप प्रभावित झालो. तो अत्यंत प्रोफेशनल आहे. आपल्या वयानुसार तो कमालीचा प्रगल्भ वाटतो.”

​एबीने पुढे म्हटले की, “मी त्याच्या खेळण्याच्या पद्धतीबद्दल बोलतोय. तो आपल्या गेम प्लॅनवर ठाम राहिला. आयपीएलमध्ये जसा खेळला, तसाच तो तिथेही खेळला. त्याने दुसऱ्या कोणाचीही नक्कल करण्याचा प्रयत्न केला नाही. गोलंदाजांसमोर तो अहंकारी नव्हता. तो नक्कीच एक उत्तम प्रोफेशनल खेळाडू बनेल.”

​दुसरीकडे, जितेश शर्मा मात्र एबीच्या या मताशी सहमत नाही. वैभवच्या मैदाबाहेरील सवयींबाबत जितेशने साशंकता व्यक्त केली. या युवा फलंदाजासोबतच्या आपल्या वैयक्तिक भेटींचे किस्से सांगताना जितेश म्हणाला की, वारंवार सल्ला देऊनही वैभव आपली ‘देर रात्री आईस्क्रीम खाण्याची सवय’ सोडायला तयार नाही.

​जितेश शर्मा हसत म्हणाला, “तो प्रोफेशनल नाहीये… हे मी खात्रीने सांगू शकतो. प्रत्येकजण त्याला प्रोफेशनल बनवण्याचा प्रयत्न करत आहे, पण मला वाटत नाही की तो कधी तसा बनेल. किमान मैदानाच्या बाहेर तरी नक्कीच नाही. मैदानावर कदाचित तो तसा असेलही. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करतोय. मी त्याला सांगतो की रात्री आईस्क्रीम खाऊ नकोस, पण तो माझे कधीच ऐकत नाही.”

​जितेश शर्माचे हे विधान सध्या हेडलाईन्स गाजवत आहे. जितेशने ज्या प्रकारे वैभवच्या सवयींबद्दल भाष्य केले आहे, त्यावरून भविष्यात त्याच्या फिटनेसबाबत समस्या निर्माण होऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत. हा १४ वर्षांचा खेळाडू आपल्या क्रिकेट प्रवासात पुढचे पाऊल टाकत असताना, त्याचा आहार आणि फिटनेस हेच तो आपल्या कारकिर्दीत किती उंची गाठेल, हे ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.

Comments are closed.