आयपीएल 2027 साठी सर्व 10 संघांचे मुख्य प्रशिक्षक निश्चित! पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर

दिल्ली कॅपिटल्सने मंगळवारी (६ ऑक्टोबर) नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली. त्यांनी या पदावर दिग्गज सौरव गांगुलीची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता सर्व १० संघांचे मुख्य प्रशिक्षक निश्चित झाले आहेत. चला तर मग पाहुया ती संपूर्ण यादी.

काही दिवसांपूर्वीच चेन्नई सुपर किंग्जनेही नवा मुख्य प्रशिक्षक म्हणून भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याची नियुक्ती केली. तर आता दिल्लीनेही मुख्य प्रशिक्षक घोषित केला. चेन्नईने पाच वेळा आयपीएल जिंकले, मात्र मागील काही हंगामांमधील त्यांची कामगिरी खालावली आहे. दुसरीकडे दिल्लीची कामगिरी निराशाजनक झाली. त्यामुळे २०२७ च्या हंगामात कोणाची कशी कामगिरी होते, याकडे लक्ष असेल.

दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक सौरव गांगुलीने याआधी फ्रॅंचायजीचे क्रिकेट संचालक म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी आता हेमांग बदानी यांची जागा घेतली आहे, २०२५ हंगामात दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक झाले होते. तसेच झहीरने स्टीफन फ्लेमिंग यांची जागा घेतली.

आयपीएल २०२७ हंगामात तब्बल ६ विदेशी प्रशिक्षक
आयपीएल २०२७ च्या हंगामात १० पैकी सहा विदेशी प्रशिक्षक आहेत, तर केवळ चार भारतीय. या चार भारतीय प्रशिक्षकांमध्ये झहीर खान (चेन्नई सुपर किंग्ज), सौरव गांगुली (दिल्ली कॅपिटल्स), आशिष नेहरा (गुजरात टायटन्स) आणि अभिषेक नायर (कोलकाता नाईट रायडर्स) यांचा समावेश आहे.

आयपीएल २०२७ चे मुख्य प्रशिक्षक
चेन्नई सुपर किंग्ज – झहीर खान
दिल्ली कॅपिटल्स – सौरव गांगुली
गुजरात टायटन्स – आशिष नेहरा
कोलकाता नाईट रायडर्स – अभिषेक नायर
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – अँडी फ्लॉवर
मुंबई इंडियन्स – महेला जयवर्धने
पंजाब किंग्स – रिकी पॉन्टिंग
सनरायझर्स हैदराबाद – डॅनियल व्हिटोरी
लखनौ सुपर जायंट्स – जस्टिन लँगर
राजस्थान रॉयल्स – कुमार संगकारा

Comments are closed.