Health Tips: विषारी असूनही आरोग्यासाठी लाभदायी आहेत कण्हेरीची फुले
आपला निसर्ग जितका सुंदरतने नटलेला आहे, त्याचप्रमाणे आरोग्यासाठी उपयुक्त आहे. निसर्गातील अनेक झाडे, फळे, फुले ही अनेक आजांरावर रामबाण उपाय ठरू शकतात. त्यापैंकी एक आहे कण्हेरीची फुले. कण्हेरी या वनस्पतीकडे विषारी वनस्पती म्हणून पाहण्यात येते. पण, आयुर्वेदानुसार, कण्हेरीची फुले आरोग्यासाठी वरदान ठरू शकतात. कण्हेरीची पाने, फुले आणि सालींमध्ये विविध प्रकारचे औषधी गुणधर्म आढळतात. कण्हेरीच्या फुलांमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ आणि दाहक विरोधी गुणधर्म आढळतात त्यामुळे ही फुले आयुर्वेदिक औषधे म्हणून वापरण्यात येतात. आज आपण जाणून घेऊयात, विषारी असूनही कण्हेरीची फुले विविध संसर्गावर कशी उपयुक्त ठरतात.
मुळव्याध –
धावपळीच्या रोजच्या रुटीनमुळे मुळव्याध, सांधेदुखीच्या तक्रारी वाढल्या आहेत. या व्याधींवर उपाय कण्हेरीची फुले लाभदायी ठरतात. कण्हेरीतील ऍटी-इफ्लेंमेटरी गुणधर्म यावर उपयुक्त असतात.
कसे वापराल-
मुळव्याध्यासाठी फुले वाळवून त्याची पावडर बनवून घ्यावी. तयार पावडर रोज सकाळी कोमट पाण्यासोबत घ्यावी. यामुळे वेदना कमी होतात.
सांधेदुखी –
कण्हेरीतील ऍटी-इफ्लेंमेटरी गुणधर्म सांधेदुखीवर रामबाण उपाय आहे.
कसे वापराल?
सांधेदुखीसाठी कण्हेरीची फुले मोहरीच्या तेलात गरम करून सांध्यावर लावावीत. यामुळे आराम नक्कीच मिळेल.
त्वचेसाठी फायदेशीर –
कण्हेरमध्ये ऍटी-बॅक्टेरियल आणि ऍटीफंगल गुणधर्म असतात, ज्यामुळे खाज, बुरशीजन्य आजारांपासून सुटका होऊ शकतात.
कसे वापराल –
कण्हेरची फुले नारळाच्या तेलात उकळवून त्वचेवर लावल्यास त्वचोरागापासून आराम मिळतो. पण, तुमची त्वचा संवेदनशील असेल तर डॉक्टरांच्या सल्लानुसार कण्हेरीची फुले त्वचेसाठी उपयुक्त असतात.
खाजेपासून सुटका –
कण्हेरीच्या फुलात खाज कमी करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या खाजेने त्रस्त असाल तर ही फुले वापरणे फायद्याचे ठरेल.
कसे वापराल –
यासाठी कण्हेरीची पाने लवंग तेलात शिजवून घ्यावीत. तयार तेल ज्या ठिकाणी खाज येते त्यावर वापरता येईल.
पचनसंस्थेसाठी फायदेशीर –
कण्हेरीच्या फुलांमध्ये अपचन, गॅस, ऍसिडीटी कमी करणारे गुणधर्म असतात.
कसे वापराल –
फुले वाळवून पावडर तयार करून घ्यावी. तयार पावडर कोमट पाण्यात टाकून प्यावी. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळेल.
हृदयासाठी फायदेशीर –
कण्हेरची फुले हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर असतात. कण्हेरीच्या फुलांमुळे रक्तवाहिन्या मजबूत होतात आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.
कसे वापराल –
फुलांचा अर्क तयार करून तुम्ही पिऊ शकता.
हेही पाहा –
Comments are closed.