Health Tips : चहासोबत खाऊ नयेत हे पदार्थ
भारतात चहाप्रेमींची कमतरता नाही. हवामान काहीही असो, भारतातील लोकांचा दिवस हा चहाशिवाय सुरू होत नाही. असे बरेच लोक आहेत ज्यांना दिवसातून 5 ते 6 वेळा किंवा त्याहून अधिक वेळा चहा पिणे आवडते. सकाळची सुरुवात करायची असो किंवा संध्याकाळचा थकवा घालवायचा असो. चहा हा प्रत्येक आजारावरचा इलाज मानला जातो. मात्र अनेकांना केवळ चहा पिणे आवडत नाही. त्यासोबत बिस्किटे, पकोडे किंवा इतर अनेक प्रकारचे स्नॅक्स खायला आवडतात. यामुळे चहा पिण्याचा आनंद द्विगुणित होतो, पण तुम्हाला माहिती आहे का की चहासोबत काही गोष्टी खाऊ नयेत? खरंतर, काही अन्नपदार्थांचा तुमच्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो. आज या लेखात आपण जाणून घेऊयात चहासोबत कोणते पदार्थ खाणे टाळावेत याविषयी.
दूध आणि दही उत्पादने
अनेकदा तुम्ही पाहिले असेल की लोक सकाळच्या नाश्त्यात चहासोबत पराठा आणि दही देखील खातात. मात्र हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. याचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. खरंतर, दूध किंवा दह्याची उत्पादने चहासोबत खाल्ल्यास त्यात असलेले टॅनिन आणि कॅफिन आम्लता आणि गॅसची समस्या निर्माण करू शकते.
फळे खाऊ नका
चहासोबत कधीही कोणतेही फळ खाऊ नये, विशेषतः लिंबूवर्गीय फळे ज्यात व्हिटॅमिन सीचे प्रमाण चांगले असते. या सवयीमुळे तुमची पचनसंस्था बिघडू शकते. चहामध्ये असलेले आम्लयुक्त घटक फळांमधील जीवनसत्त्वांसोबत मिक्स होतात. यामुळे बद्धकोष्ठता सारख्या समस्या उद्भवू शकतात.
बेसनापासून बनवलेल्या गोष्टी
बहुतेक लोकांना चहासोबत बेसनाचे पकोडे खायला आवडतात पण हे तुमच्या पोटासाठी अजिबात चांगले नाही. खरंतर बेसन आधीच जड प्रकृतीचा आहे. चहामध्ये असलेले टॅनिन बेसनाच्या पचनास अडथळा आणते. यामुळे गॅस आणि अपचनाची समस्या उद्भवू शकते.
अंडी किंवा मांसाहार
चहासोबत कधीही अंडी किंवा मांसाहारी पदार्थ खाऊ नयेत. त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आढळतात आणि चहामध्ये टॅनिन असते. या दोन्हींमुळे पचनक्रिया मंदावते. यामुळे अॅसिडिटी आणि पोटदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात .
तळलेले पदार्थ
समोसे, कचोरी किंवा चिप्स सारख्या तळलेल्या पदार्थांना चहासोबत खाणे नेहमीच पसंत केले जाते. मात्र हे पोटाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जात नाहीत. यामध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते जे चहामध्ये मिसळल्यास पोटातील आम्ल वाढते. आणि ऍसिडिटीचा त्रास होऊ लागतो.
काय करावं?
चहा आणि जेवणात कमीत कमी 30 मिनिटांचे अंतर ठेवा.
रिकाम्या पोटी चहा पिणे टाळा.
जर तुम्हाला चहासोबत काही खावेसे वाटले तर लाह्या, कुरमुरे किंवा ओट्स कुकीजसारखे हलके स्नॅक्स निवडा.
हेही वाचा : Sunset Walk Benefits : मॉर्निंगप्रमाणेच सनसेट वॉकही फायदेशीर
संपादित – तनवी गुडे
Comments are closed.