माधुरीची घरवापसी, उच्चाधिकार समितीसमोर आज सुनावणी

कोल्हापूर येथील जैन मठातील माधुरी हत्तीण गुजरात येथून परत आणण्यासंदर्भात आज मंगळवारी उच्चाधिकार समितीसमोर सुनावणी होणार आहे. जैन मठ व वनताराने अॅड. मनोज पाटील यांच्यामार्फत यासाठी प्रस्ताव तयार केला आहे.
माधुरी हत्तिणीचे हाल होत असल्याचा आरोप पेटाने केला. त्याची दखल घेत उच्चाधिकार समितीने या हत्तिणीला गुजरात येथील वनतारा येथे पाठवण्याचे आदेश जारी केले. त्याविरोधात मठाने मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. न्यायालयाने उच्चाधिकार समितीचे आदेश वैध ठरवले. नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले. न्यायालयाने माधुरीच्या पाठवणीचे आदेश दिले. त्यानुसार माधुरीला गुजरात येथे पाठवण्यात आले. या वेळी नांदणी गावकऱ्यांचे अश्रू अनावर झाले. त्यानंतर सोशल मीडियावर याचा मोठ्या प्रमाणात जनक्षोभ उसळला. अखेर हत्तिणीला पुन्हा कोल्हापूर येथे आणण्यासाठी वनताराने संमती दिली. त्यानुसार उच्चाधिकार समितीसमोर ही सुनावणी होणार आहे.
- माधुरीसाठी सर्व सुविधा असलेला निवारा तयार केला जाईल. यासाठी जैन मठाकडून जमीन दिली जाईल. बांधकामाचा व अन्य सुविधांचा खर्च वनातारा करेल.
- बांधकामाचा आराखडा तयार करून समितीकडे सादर केला जाईल.
- बांधकाम झाल्यानंतर वनताराने हा निवारा जैन मठाकडे हस्तांतर करावा.
- समितीने परवानगी दिल्यानंतर वनताराने जामनगर येथून हत्तिणीला नांदणीतील जैन मठात सुरक्षित आणावे.
- माधुरीला परत दिल्यानंतर त्यावर वनताराचा कोणत्याही प्रकारचा अधिकार राहणार नाही.
Comments are closed.