हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टची लक्षण
गेल्या काही वर्षात फक्त वयस्कच नाही तर तरुणांमध्येही हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. आनुवंशिक , बिघडलेली लाईफस्टाईल, ताणतणाव, चुकीच्या खाण्यापिण्याच्या पद्धती आणि व्यायामाचा अभाव ही यामागची प्रमुख कारणे आहेत. पण असे असले तरी बऱ्याचजणांना हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट यातला फरक ओळखता येत नाही. त्यासाठी त्याची लक्षणे समजून घेणे गरजेचे आहे.
बऱ्याचजणांना हार्ट अटॅक म्हणजे कार्डियक अरेस्ट असल्याचे वाटते. पण तज्ज्ञांनी दिलेल्या माहीतीनुसार या दोघांमध्ये बरेच अंतर आहे. ज्यावेळी हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळे ( ब्लॉकेजेस) येतात तेव्हा हार्ट अटॅक येतो. तर ज्यावेळी हृदय अचानक काम करणे बंद करतो. त्यावेळी कार्डियक अरेस्ट आला असे म्हणतात. कार्डियक अरेस्ट सगळ्यात धोकादायक असतो. कारण यात रुग्णाचा काही मिनिटातच मृत्यू होतो. यामुळे ज्यांच्या घरात हृदयाशी संबंधित व्याधींचा इतिहास असेल त्यांनी नेहमी सावधानता बाळगायला हवी. प्रामुख्याने जर तुमच्या कुटुंबात आई- वडील यांना बीपी, डायबिटीज किंवा हृदयाशी संबंधित विकार असतील तर वरील काही लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टची महिला व पुरुषांमधील लक्षणेही वेगवेगळी आहेत.
तसेच हृदयाचे कार्य सुरळीत सुरू आहे का हे तपासण्यासाठी ईसीजी, टुडी ईको अशा चाचण्या करून घ्याव्यात.त्यामुळे पुढचा अनर्थ टाळता येईल.
कार्डियेक अरेस्ट लक्षणे
चक्कर येणे, अचानक बेशूद्ध पडणे
तज्ज्ञांच्यामते जर तुम्हाला अचानक चक्कर येत असतील तर त्याला नेहमी अशक्तपणाचे लक्षण समजू नये. कदाचित हृदयाच्या कार्यप्रणालीमध्ये बिघाड झाल्याचे ते लक्षण असू शकते.
धाप लागणे, थकवा येणे
जर थोडेफार काम केल्यावरही तुम्हाला थकवा जाणवत असेल, काहीही काम न करता दिवसभर थकवा जाणवत असेल तर या संकेताकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
छातीवर दबाव येणे, अस्वस्थ वाटणे
जर तुम्हाला छातीत तीव्र नाही पण सौम्य कळा जाणवत असतील, छाती जड झाल्याचे किंवा पित्त झाल्याचे जाणवत असेल तर सावध व्हा. कारण ही कार्डियेक अरेस्टची प्राथमिक लक्षणे होऊ शकतात.
हृदयाचे ठोके वाढणे
जर अचानक तुमच्या छातीत धडधडायला लागले, अस्वस्थ वाटू लागले तर तात्काळ डॉक्टरांकडे धाव घ्यावी. कारण हृदयाचे ठोके वेगात वाढनेही कार्डियेक अरेस्टचं कारण होऊ शकत. ही सर्व कार्डियेक अरेस्टची लक्षणे आहेत.
हार्ट अटॅक
तर दुसरीकडे हार्ट अटॅक कधीही अचानक येत नाही. तर तो शरीराला वारंवार संकेत देत असतो. त्यामुळे तुम्हाला निदान करायला वेळ मिळतो. तसेच हार्ट अटॅक आल्यास प्राण वाचवण्यासाठी काही गोल्डन हवर्सही मिळू शकतात. पण कार्डियेक अरेस्टमध्ये तसे होत नाही.
त्यामुळे जर हृदयाशी संबंधित आजार टाळायचे असतील तर सकस व पुरेसे अन्न, पुरेशी झोप, नियमित व्यायाम, नियंत्रित वजन, मद्य व सिगारेटपासून लांब राहावे. ताण तणाव टाळावा. बीपी, शुगर, कोलस्ट्रॉलची नियमित तपासणी करावी.
Comments are closed.