सिंधुदुर्गात पावसाची आतषबाजी

सिंधुदुर्ग जिल्हाभरात गुरुवारी संध्याकाळी जोरदार अवकाळी पाऊस बरसला. गेले चार दिवस सतत ऐन दिवाळीत विजांच्या कडकडाटासह पावसाची आतषबाजी जिह्यात सुरू आहे. या पावसाने उभे भातपीक जमीनदोस्त झाले असून भातपिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. सततच्या पावसाने भाताला ऐन कापणीतच शेतात कोंब येण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. दरम्यान, आज दिवसभर पावसाची संततधार सुरू होती.

Comments are closed.