Dehradun Landslide जलविद्युत प्रकल्पाजवळ उत्तराखंडमध्ये भूस्खलन

► वृत्तसंस्था देहराडून
उत्तराखंडमधील विकासनगर येथे मुसळधार पावसामुळे लखवार जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन झाले. या आपत्तीमध्ये अनेक वाहने आणि यंत्रसामग्री ढिगाऱ्याखाली गाडली गेली. उत्तराखंडमधील ऋषिकेशच्या डोंगराळ भागात सततच्या पावसामुळे गंगा नदीच्या पाण्याची पातळी वेगाने वाढली आहे.

गंगेचे पाणी धोक्याच्या पातळीपेक्षा केवळ 1.10 मीटर खाली वाहत असल्याने परमार्थ निकेतन येथील गंगा आरतीचे ठिकाण पाण्याखाली गेले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने लोकांना नदीपासून दूर राहण्याचे आणि घाटांवर स्नान न करण्याचे आवाहन केले आहे. शनिवारपासून उत्तराखंडच्या सर्व जिह्यांमध्ये अधूनमधून पाऊस सुरू आहे.

देहराडून, बागेश्वर, चमोली, रुद्रप्रयाग, नैनिताल येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे पौरी, रुद्रप्रयाग, चमोली आणि उत्तरकाशी येथे भूस्खलन झाले आहे. दमदार पावसामुळे जवळपास 120 रस्ते बंद असल्याची नोंद प्रशासनाने केली आहे.

Comments are closed.