मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 10 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

सुट्टीनिमित्त फिरायला गेलेले चाकरमानी परतीच्या मार्गावर असल्याने मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. माणगावमध्ये सुमारे 10 किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या वाहतूक कोंडीचा मंत्री भरत गोगावले यांनाही फटका बसला. भरत गोगावले हे देखील या वाहतूक कोंडीत अडकले.

Comments are closed.