तुर्कीत हेलिकॉप्टर हॉस्पिटलला धडकून खाली कोसळले, दुर्घटनेत चौघांचा मृत्यू

दाट धुक्यामुळे टेक ऑफ दरम्यान हेलिकॉप्टर हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्याला धडकून खाली कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दाट धुक्यामुळे हा अपघात घडल्याचे मुगला प्रांतीय गव्हर्नर इद्रिस अकबिक यांनी सांगितले.

हेलिकॉप्टरने रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास उड्डान केले. उड्डान घेताच दाट धुक्यात ते हरवले. यानंतर थेट हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्याला धडकून खाली कोसळले. यात हेलिकॉप्टरमधील चौघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पायलट, एक डॉक्टर आणि हेलिकॉप्टरमधील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. दुर्घटनेप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Comments are closed.