Hema Pimpale On Walmik Karad Police Custody Beed Court
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला अखेर 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. न्यायालयाच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या आणि वकील हेमा पिंपळे यांनी बीड न्यायालयाबाहेर घोषणाबाजी केली. तसेच, ‘लोक रस्त्यावर उतरतात तेव्हाच अशा केसेसमध्ये (हत्या प्रकरण) लक्ष दिलं जातं.
बीड : बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. देवेंद्रजी तुम्ही बीड जिल्ह्यात या आणि कायदा आणि सुव्यवस्था सुधारा, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या व वकील हेमा पिंपळे यांनी बीड न्यायालयाबाहेर संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध केला. (Hema Pimpale On Walmik Karad Police Custody Beed Court)
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला अखेर 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. न्यायालयाच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या आणि वकील हेमा पिंपळे यांनी बीड न्यायालयाबाहेर घोषणाबाजी केली. तसेच, ‘लोक रस्त्यावर उतरतात तेव्हाच अशा केसेसमध्ये (हत्या प्रकरण) लक्ष दिलं जातं. या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला अखेर 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, असं म्हणत त्यांनी सरकावर ताशेरे ओढले.
नेमकं काय म्हणाल्या हेमा पिंपळे?
“संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. कारवाईच्या प्रत्येक गोष्टीत पारदर्शकता पाहिजे. आमच्या सोबत महिला आहेत. बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. देवेंद्रजी तुम्ही बीड जिल्ह्यात या आणि कायदा आणि सुव्यवस्था सुधारा, असे वकील हेमा पिंपळे यांनी बीड न्यायालयाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना म्हटले.
माध्यमांशी संवाद साधत असतानाच हेमा पिंपळे यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलीस आणि त्यांच्यात झटापट झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला अखेर 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वाल्मिक कराडला आज बीड कोर्टात जर करण्यात आलं होतं. यावेळी एसआयटी आणि सरकारी वकिलांनी महत्त्वाचा युक्तिवाद केला. या सुनावणी दरम्यान, वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा –
Comments are closed.