आसाममध्ये 1.3 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसामच्या राजधानीत दोन छाप्यांमध्ये सुमारे 1.3 कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त करण्यात आले. याप्रकरणी दोन महिलांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी बुधवारी सांगितले. गुवाहाटी पोलिसांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये कारवाईसंबंधी माहिती दिली. एका गुप्त माहितीच्या आधारे सकाळी बसिष्ठ पोलीस स्टेशन परिसरातील खानापारा येथे छापा टाकत एका महिलेला ताब्यात घेण्यात आले. सदर 47 वर्षीय महिला मणिपूरच्या चुराचंदपूर येथील रहिवासी आहे. अन्य एका कारवाईदरम्यान खानापारा परिसरातील एका भाड्याच्या घरात छापा टाकून अमली पदार्थांचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मूल्यमापनानुसार जप्त केलेल्या ड्रग्जची एकूण किंमत सुमारे 1.28 कोटी रुपये इतकी आहे.
Comments are closed.