लेबनॉनमध्ये हिजबुल्ला-इस्रायली सैन्य आमनेसामने आहेत

लेबनॉनच्या भूमीवर सैन्य अभियान सुरू झाले असून ते वाढविले जाण्याची शक्यता असल्याची पुष्टी इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी अधिकृत स्वरुपात दिली आहे. इस्रायलचे सैनिक दीर्घकाळापासून लेबनॉनमध्sय सक्रीय आहेत. 2024 च्या अखेरीस झालेल्या युद्धविरामाचे उल्लंघन करत इस्रायलने लेबनॉनमध्ये   युद्धाची यापूर्वीच तयारी केली होती.

इस्रायलचे आवाहन

इस्रायलचे राष्ट्रपती आयजॅक हर्जोग यांनी लेबनॉनमध्ये सशस्त्र संघटना हिजबुल्लाह विरोधात चालू असलेल्या कारवाईत समर्थन देण्याचे आवाहन युरोपीय देशांना केले आहे. लेबनॉन आणि इस्रायलदरम्यान थेट चर्चा करविण्याच्या फ्रान्सच्या प्रस्तावाचे त्यांनी स्वागत केले आहे. चर्चा पुढे नेण्याची हीच योग्य वेळ आहे आणि यामुळे दोन्ही देशांदरम्यान तणाव कमी करण्याचा मार्ग निघू शकतो असे हर्जोग म्हणाले.

हिजबुल्लाहचा सैनिकांवर हल्ला

लेबनॉनच्या सीमेवर हिजबुल्लाहने इस्रायलचे सैनिक आणि वाहनांना लक्ष्य केले आहे. इस्रायलच्या सैन्याकडून लेबनॉनमध्ये अभियान सुरू करण्याच्या घोषणेनंतर हिजबुल्लाहने कमीतकमी तीन शहरांवर हल्ले पेले आहेत. आइटारूनमध्ये इस्रायलच्या तळावर रॉकेट डागण्यात आले आहेत. ओदाइस्सेहमध्ये इस्रायली सैनिक आणि वाहनांना तोफगोळ्यांद्वारे लक्ष्य केल्याचा दावा हिजबुल्लाहकडून करण्यात आला आहे. तर टायबेह शहरात इस्रायलचे सैनिक, वाहने आणि मर्कवा रणगाड्यावर रॉकेटने हल्ले करण्यात आले.

Comments are closed.