स्वातंत्र्यदिनानिमित्त उच्च सतर्कता

दिल्लीला लक्ष्य करण्याचा धोका : सुरक्षा यंत्रणा सतर्क

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

पुढील आठवड्यात होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांना मोठा अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात दहशतवादी राजधानी दिल्लीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, खलिस्तान दहशतवादी संघटना आणि खलिस्तान समर्थक समाजविरोधी घटक 15 ऑगस्ट रोजी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतात. दिल्लीला एके-47, आरडीएक्स आणि हँडग्रेनेडने लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर शीख फॉर जस्टिसचे स्पिलर सेल देखील दिल्लीतील वातावरण बिघडू शकतात, असा इशारा गुप्तचर विभागाकडून देण्यात आला आहे.

देशात घातपात घडवण्यासाठी विविध दहशतवादी संघटना सक्रीय झाल्याचा दावा गुप्तचर विभागाने केला आहे. सीमेपलीकडून अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा साठा सतत येत असून त्यामध्ये अत्याधुनिक बंदुका, रायफल आणि स्फोटकांचा समावेश आहे. या शस्त्रांनी दिल्लीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न संशयित दहशतवाद्यांकडून केला जाऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. या अलर्टमुळे सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न

गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्यानुसार, शीख फॉर जस्टिसचे स्लीपर सेल 15 ऑगस्ट रोजी गुरुपतवंत सिंह पन्नू यांच्या आदेशानुसार लाल किल्ला आणि संवेदनशील भागात काही भडकाऊ कारवाया करू शकतात. हे लोक संवेदनशील भागात खलिस्तान समर्थक घोषणा लिहून वातावरण बिघडवू शकतात. या अलर्टनंतर, दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विशेष सेलला अलर्टवर ठेवण्यात आले आहे. दिल्ली पोलीस मुख्यालयाकडून शीख फॉर जस्टिसच्या कारवायांवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या विशेष सूचना स्पेशल सेलला मिळाल्या आहेत.

Comments are closed.