फिलिपीन्स, तैवानला हायअलर्ट; 230 किमी वेगाने येतेय विनाशकारी वादळ

विनाशकारी ठरू शकणारे ‘सुपर टायफून रागास’ दक्षिण चीनच्या दिशेने वेगाने सरकत असून या पार्श्वभूमीवर फिलिपीन्स आणि तैवानला हाय अलर्ट देण्यात आला आहे. संभाव्य पूर आणि भूस्खलनाचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाने लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. वादळाची ताकद वेगाने वाढत आहे आणि मंगळवार दुपारपर्यंत ते बटानेस किंवा बाबुयान बेटांवर धडकू शकते. फिलिपीन्सच्या हवामान विभागाच्या मते, सकाळी 11 वाजता वाऱयाचा वेग 185 किमी/तास होता, पश्चिमेकडे द्वीपसमूहाच्या दिशेने सरकत असताना 230 किमी/तास पर्यंत पोहोचला. यात आणखी वाढ होऊ शकते. फिलिपीन्स न्यूज एजन्सीनुसार, राष्ट्रपती फर्डिनांड मार्कोस यांनी राष्ट्रीय आपत्ती जोखीम व्यवस्थापन परिषद (एनडीआरआरएमसी) आणि त्यांच्या 44 सदस्यीय एजन्सींना वादळ देशाच्या हद्दीतून बाहेर पडेपर्यंत सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
Comments are closed.