कपिल मिश्रा आणि परवेश वर्मा यांना हायकोर्टाने दिलासा दिला आहे.
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली दंगलीशी निगडित प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाकडून भाजप नेते आणि मंत्री कपिल शर्मा तसेच प्रवेश वर्मा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने 2020 च्या दंगलीशी निगडित कथित प्रक्षोभक भाषणांप्रकरणी या दोन्ही नेत्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. नेत्यांच्या भाषणांवरून एफआयआर नोंदविले जावेत अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती.
दिल्ली दंगलीशी निगडित प्रकरणांमध्ये दाखल याचिकांच्या एका समुहाला उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. या याचिकांमध्ये कथित प्रक्षोभक भाषणांवरून राजकीय नेत्यांवर गुन्हे नोंदविणे आणि 2019 च्या सीएए विरोधी निदर्शनांदरम्यान जामिया मिल्लिया इस्लामियामध्ये कथित स्वरुपात पोलिसांकडून झालेल्या बळाच्या वापराची स्वतंत्र चौकशी करविण्याची मागणी करण्यात आली होती. उच्च न्यायालयात 15 याचिका दाखल झाल्या होत्या. न्यायाधीश विवेक चौधरी आणि मनोज जैन यांच्या खंडपीठाने या याचिकांवर सुनावणी केली. दिल्ली दंगलीमध्ये 50 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला होता.
Comments are closed.