जरी-मरी मंदिरामागील अनधिकृत बांधकामावर बडगा, हायकोर्टाचे पालिकेला आदेश; बाजू ऐकून घ्या

वांद्रे पश्चिमेकडील तलावाजवळ असलेल्या जरी-मरी मंदिरामागील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पालिकेला दिले.
या बांधकामाविरोधात मंगेश हेदुलकर यांनी 2008मध्ये जनहित याचिका दाखल केली होती. मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे व न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. पालिकेने याचिकाकर्ते व हे बांधकाम करणाऱयाला नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे. हे बांधकाम अवैध असल्याचे कारवाई करावी, असे आदेश देत न्यायालयाने ही याचिका निकाली काढली.
Comments are closed.