माजी मुख्याध्यापिकेला हायकोर्टाचा दणका

माध्यान्ह भोजन योजनेशी संबंधित फसवणूक प्रकरणात अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणाऱ्या माजी मुख्याध्यापिकेला हायकोर्टाने दणका दिला आहे. याप्रकरणी कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे स्पष्ट करत न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या एकलपीठाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

चेंबूरमधील स्वामी विवेकानंद हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य राधा नारायण यांच्यावर मुलांना वाटप करण्यासाठी शाळेत पुरवलेल्या अन्नधान्याचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 420 (फसवणूक) आणि 409 (गुन्हेगारी विश्वासभंग) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अटक टाळण्यासाठी राधा नारायण यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला.

Comments are closed.