रूळ ओलांडतानाचा दावा फेटाळला, आठ लाख देण्याचे आदेश

प्रवासी रेल्वे रूळ ओलांडताना दगावल्याचा दावा करणाऱ्या मध्य रेल्वेला उच्च न्यायालयाने चांगलीच चपराक दिली आहे. मृत प्रवाशाच्या पुटुंबाला आठ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने रेल्वेला दिले.
कोपर खैराणे ते जुई नगर प्रवासात या प्रवाशाचा लोकलमधून पडून मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांनी नुकसानभरपाईसाठी रेल्वे न्यायाधिकरणात अर्ज केला. प्रवाशाचा मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना झाल्याचा युक्तिवाद रेल्वेने केला. तो ग्राह्य धरत न्यायाधिकरणाने नुकसानभरपाई नाकारली. त्याविरोधात घानिया बरी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. शर्मिला देशमुख यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. प्रवाशाचा मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना झाला याचा पुरावा रेल्वेने सादर केला नाही. पोलिसांच्या अहवालानुसार प्रवाशाचा मृत्यू लोकलमधून पडल्याने झाला आहे. त्यामुळे या प्रवाशाच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळायलाच हवी, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
Comments are closed.