अभिषेकची एन्ट्री, अर्शदीप बाहेर? पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्यासाठी कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा थरार पाहायला मिळणार आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील ज्या सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते, तो भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) महामुकाबला आता अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या मैदानावर हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येतील.
भारतीय संघासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे अभिषेक शर्माच्या (Abhishek Sharma) प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे.
रिपोर्ट्सनुसार अभिषेक टीम इंडियासोबत कोलंबोला रवाना झाला असून पाकिस्तानविरुद्ध तो मैदानात उतरण्याची शक्यता आहे. जर अभिषेक पूर्णपणे फिट असेल, तर संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागेल. अशा स्थितीत ईशान किशन (Ishaan kishan) आणि अभिषेक शर्मा जोडीने डावाची सुरुवात करतील.
तिसऱ्या क्रमांकाची जबाबदारी तिलक वर्मा सांभाळेल. तर, कर्णधार सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फटकेबाजी करताना दिसेल. डावाच्या शेवटच्या षटकांत हार्दिक पंड्या आणि रिंकू सिंग यांच्यावर पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई करण्याची जबाबदारी असेल. हार्दिकने मागील सामन्यात 28 चेंडूत 52 धावा केल्या होत्या.
कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमची खेळपट्टी फिरकीपटूंना पूरक आहे. हे लक्षात घेता संघ व्यवस्थापन काही धाडसी निर्णय घेऊ शकते. अर्शदीप सिंगच्या जागी कुलदीप यादवला संधी मिळू शकते. शिवम दुबेच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला खेळवण्याचा विचार होऊ शकतो. जसप्रीत बुमराह हा एकमेव मुख्य वेगवान गोलंदाज असेल आणि त्याला हार्दिक पंड्या साथ देईल.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा/संजू सॅमसन, ईशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, शिवम दुबे/वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
Comments are closed.