आयपीएलचा सर्वोत्तम सलामीवीर केएल राहुल! 1000 पेक्षा अधिक धावा करताना सर्वाधिक सरासरी, यादीत कोहलीचा समावेश
आयपीएल २०२६ मध्ये आज (बुधवार १ एप्रिल) पाचवा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एकाना स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात लखनऊकडून रिषभ पंत आणि दिल्लीकडून केएल राहुल खेळताना दिसणार आहेत. दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल याने हा हंगाम सुरू होण्याआधीच राहुल सलामीला फलंदाजी करणार हे स्पष्ट केले होते.
मागील वर्षी राहुलने दिल्लीकडून खेळताना मधल्या फळीत फलंदाजी केली होती. त्याने १० डावांमध्ये ५३ च्या सरासरीने ३७१ धावा केल्या होत्या. आता तो सलामीला फलंदाजी करताना दिसणार आहे.
आयपीएलमध्ये सलामीला फलंदाजी करताना राहुलची कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे. त्याने १००० पेक्षा अधिक धावा करताना सलामीवीर म्हणून त्याची सरासरी ४९.६४ एवढी आहे. तसेच त्याने आयपीएलमध्ये ४००० धावांपेक्षा अधिक धावा सलामीला येताना केल्या आहेत.
राहुलनंतर विराट कोहलीचा क्रमांक लागतो. त्याने ४७.४५ च्या सरासरीने आयपीएलमध्ये सलामीला येताना १००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आहे. त्याने ४४.०१ च्या सरासरीने १००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. न्यूझीलंडचा डेवॉन कॉनवे चौथ्या क्रमांकावर असून त्याने ४३.२ च्या सरासरीने १००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. पाचव्या स्थानावर युनिव्हर्स बॉस क्रिस गेल आहे. त्याची सरासरी ४१.८६ एवढी आहे.
पहिल्या पाचमध्ये रोहित शर्मा नाही. त्याची सरासरी फारच कमी राहिली आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक सरासरी असलेल्या सलामीचा फलंदाज (किमान १००० धावा)
केएल राहुल – ४९.६४
विराट कोहली – ४७.४५
ऋतुराज गायकवाड – ४३.२
डेव्हॉन कॉनवे – ४३.२
ख्रिस गेल – 41.86
Comments are closed.