आर्थिक गुन्ह्यांमध्ये मुंबईकरांची सर्वाधिक फसवणूक!

राज्यात आर्थिक फसवणुकीचे प्रकार प्रचंड वाढले असून गेल्या वर्षभरात अन्य शहरांच्या तुलनेत मुंबईत सर्वाधिक आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. एकट्या मुंबई शहरात 51, 873 आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. त्यापाठोपाठ पुण्यात 22 हजार 059 आर्थिक गुन्हे घडले. राज्याच्या गृह खात्याच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

‘डिजिटल इंडिया’चा गवगवा करीत असतानाच ऑनलाईन व्यवहारांच्या आडून आर्थिक फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. राज्यात गेल्या वर्षभरात अशा गुन्ह्यांच्या संख्येत चिंतनीय वाढ झाली आहे. गृह खात्याच्या अहवालातील आकडेवारीनुसार 2024मध्ये राज्यात 2 लाख 19 हजार 047 आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले.

Comments are closed.