रणजी सामन्यात कोहलीचा बोल्ड काढणाऱ्या सांगवानची मोठी प्रतिक्रिया! म्हणाला…
सध्या रणजी ट्राॅफी (Rani Trophy) खेळली जात आहे. त्यामध्ये दिल्ली विरूद्ध रेल्वे (Delhi vs Railways) संघात सामना खेळला गेला. या सामन्यात दिल्लीने एक डाव आणि 19 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात दिल्ली संघात भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) देखील खेळत होता. पण तो 6 धावांवरतीय तंबूत परतला. दरम्यान विराटची महत्वाची विकेट’ घेतल्यानंतर रेल्वेचा वेगवान गोलंदाज हिमांशू सांगवान (Himanshu Sangwan) भारतीय क्रिकेट जगतात चर्चेत आला आहे. दरम्यान त्याने याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
हिमांशू सांगवानने (Himanshu Sangwan) दिवसाच्या सुरुवातीच्या सत्रात माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) ऑफ-स्टंप उलथवून टाकला. सांगवानने ही विकेट मोठ्या उत्साहात साजरी केली. या यशानंतर तो सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला आहे.
29 वर्षीय सांगवान, जो त्याचा 24वा प्रथम श्रेणी सामना खेळत होता, तो म्हणाला, “ही माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची विकेट आहे, विराट कोहली संपूर्ण देशासाठी प्रेरणा आहे. कोहलीमुळे स्टेडियममध्ये पोहोचलेल्या हजारो चाहत्यांनी सांगवानला चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा दिली. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी इतके लोक रणजी ट्रॉफी सामन्यासाठी येताना पाहिले, ते आपल्या सर्वांसाठी खास होते.”
मैदानात काही वेळ घालवल्यानंतर, कोहलीने सांगवानविरूद्ध आक्रमक खेळ केला, क्रीजच्या बाहेरून खेळत गोलंदाजाच्या चेंडूवर सरळ चौकार मारला. त्याने पुढचा चेंडूही मारण्याचा प्रयत्न केला पण तो पूर्णपणे चुकला आणि चेंडू ऑफ स्टंपवर आदळला. त्यानंतर बाद होऊन तो तंबूत परतला.
हिमांशू संगवानच्या मालकीच्या धोनी आणि रोहितच्या चाहत्यांचे मालक होते ज्यांना असे वाटले की गोलंदाज विराट कोहलीचा आदर करीत नाही
– पॅरी (@ब्लेंटइंडियानॅंगल) 31 जानेवारी, 2025
महत्त्वाच्या बातम्या-
हर्षित राणाला खेळवल्यामुळे इंग्लंड खेळाडूंनी उठवले प्रश्न, भारताच्या प्रशिक्षकाचे रोखठोक उत्तर
आयपीएलमध्ये अनसोल्ड ठरलेल्या स्टार खेळाडूची SA20 मध्ये धमाकेदार कामगिरी!
38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा; महाराष्ट्राचे दोन्ही खो खो संघ जेतेपदापासून एक पाऊल दूर!
Comments are closed.