जोस बटलरच्या निशाण्यावर ऐतिहासिक विक्रम, अनेक दिग्गज मागे पडण्याच्या वाटेवर

जोस बटलर या आयपीएलच्या हंगामात शानदार प्रदर्शन करत आहे. गुजरात संघाच्या चांगल्या प्रदर्शनात जोस बटलरची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. आता बटलर आयपीएलमध्ये एका खास रेकॉर्डच्या खूप जवळ पोहोचला आहे. आशा आहे की, हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात तो हा विक्रम बनवेल. त्याला काही धावांची गरज आहे यानंतर त्याचे आयपीएलमध्ये 4000 धावा पूर्ण होतील.

जोस बटलरने आतापर्यंत आयपीएलमध्ये 116 सामने खेळून 3988 धावा केल्या आहेत. सध्या तो गुजरात संघासाठी खेळत आहे. पण या आधी तो मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्ससाठी सुद्धा खेळलेला आहे. यादरम्यान त्याची फलंदाजी सरासरी 40.28 राहिली आहे आणि स्ट्राइक रेट 149.41 इतका राहिला आहे.

बटलरने आतापर्यंत आयपीएलमध्ये 7 शतक आणि 23 अर्धशतके झळकावली आहेत. त्याला आता फक्त 12 धावांची गरज आहे, ज्यामुळे त्याच्या आयपीएलमध्ये 4000 धावा पूर्ण होतील. जर त्याने सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध या धावा केल्या तर तो सर्वात वेगाने 4000 धावा पूर्ण करणारा चौथा खेळाडू ठरेल.

आयपीएलमध्ये सर्वात वेगाने 4000 धावा करण्याचा विक्रम केएल राहुलच्या नावावर आहे. त्याने फक्त 105 डावांमध्ये हा आकडा पार केला होता. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर क्रिस गेल आहे, ज्याने 112 डावांमध्ये 4000 धावा पूर्ण केल्या होत्या. डेव्हिड वॉर्नरने सुद्धा हा कारनामा 114 डावांमध्ये केला होता. आता जोस बटलर या रेकॉर्डच्या खूप जवळ आहे. जर त्याने पुढच्या डावांमध्ये या धावा पूर्ण केल्या तर 116 डावांमध्ये 4000 धावा पूर्ण करेल. त्यामुळे तो फाफ डुप्लेसिसला मागे टाकेल ज्याने 121 डावांमध्ये हा कारनामा केला होता.

या हंगामात जोस बटलर आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा करणारा विदेशी फलंदाज आहे. तो सध्या पाचव्या स्थानावर आहे. त्याच्यापुढे 4 खेळाडू आहेत, ते सर्व भारतीय आहेत. त्याने आतापर्यंत या हंगामात 9 सामने खेळून 406 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 81.20 तसेच स्ट्राईक रेट 168.46 राहिला आहे. आता सर्वांच्या नजरा याच गोष्टीवर आहेत की, बटलर पुढच्या सामन्यात 4000 धावा पूर्ण करेल, की हा विक्रम मोडण्यासाठी त्याला अजून थोडी प्रतीक्षा करावी लागेल?

Comments are closed.