पर्थ कसोटीत इतिहास घडला, 104 वर्षांत पहिल्यांदाच झाली अशी कामगिरी! इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाचं शानदार प्रदर्शन
पर्थच्या ऑप्टस स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाने केवळ दोन दिवसांत इंग्लंडचा पराभव करून ऍशेस मालिकेला विजयी सुरुवात केली (Ashes series in between AUS vs ENG). दोन दिवस चाललेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 8 विकेटने हरवले. 1921 नंतर पहिल्यांदाच ऍशेसमधील एखाद्या सामन्याचा फक्त दोन दिवसांत निकाल लागला आहे. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियासमोर 205 धावांचे लक्ष्य होते आणि ट्रॅव्हिस हेडच्या (Travis Head) तडाखेबाज खेळीच्या जोरावर त्यांनी फक्त 2 विकेट गमावून ते सहज गाठले. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 7 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.
ऍशेसचा सामना दोन दिवसांत संपल्याची घटना सर्वप्रथम 1888 मध्ये घडली होती. त्या वेळी ऑस्ट्रेलियाने हा सामना 61 धावांनी जिंकला होता. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 116 धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव केवळ 53 धावांत संपला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया 60 धावांवर बाद झाला होता. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची दुसरी खेळीही फक्त 62 धावांवर थांबली. हा त्या दौऱ्याचा पहिला सामना होता. त्या मालिकेतील दुसरा सामना ‘द ओवल’ येथे खेळला गेला आणि तोही फक्त दोन दिवसांत संपला. इंग्लंडने तो सामना डाव आणि 137 धावांनी जिंकला होता. त्यानंतर 1890 मध्ये ‘द ओवल’ आणि 1921 मध्ये नॉटिंघम येथे झालेले सामनेही दोन दिवसांत संपले होते.
दोन दिवसांत संपलेले ऍशेस कसोटी
लॉर्ड्स – 1888
ओव्हल – 1888
मँचेस्टर – 1888
ओव्हल – 1890
नॉटिंगहॅम – 1921
पर्थ – 2025
चारही डाव मिळून या सामन्यात एकूण 847 चेंडू टाकले गेले. चेंडूंंच्या संख्येनुसार हा ऍशेस इतिहासातील तिसरा सर्वात लहान सामना ठरला. 1888 मध्ये मँचेस्टरमध्ये झालेल्या सामन्याचा निकाल 788 चेंडूत लागला होता. 1888 मधील लॉर्ड्स कसोटी 792 चेंडूत संपली होती. 1895 मध्ये सिडनीत झालेला सामना 911 चेंडूत निर्णायक ठरला होता. पर्थ कसोटीमध्ये हा विक्रम मोडला गेला.
चेंडूंच्या आधारे ऍशेसमधील सर्वात छोट्या कसोटी
788 – मँचेस्टर 1888
792 – लॉर्ड्स 1888
847 – पर्थ 2025*
911 – सिडनी 1895
Comments are closed.