इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी, आरोपीकडून मुख्यमंत्र्यांच्या नावाचाही उल्लेख

इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. प्रशांत कोरटकर असे धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. यासंदर्भात सावंत यांनी फेसबुकवर पोस्ट करत माहिती दिली असून, आरोपीचे कॉल रेकॉर्डिंगही शेअर केले आहे. विशेष म्हणजे कॉल रेकॉर्डिंगमध्ये कोरटकर याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे.
“जिथं असाल तिथं ब्राम्हणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा”, अशी धमकी देत कोरटकर याने सावंत यांना शिवीगाळही केली आहे. तसेच कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याचा दावाही सावंत यांनी केला आहे.
छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सावंत यांनी आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर त्यांना ही धमकी देण्यात आली आहे. धमकीचे कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
Comments are closed.