हिटमॅन शो! 'या' दिवशी मैदानात परतणार रोहित शर्मा

मैदानावर हिटमॅनचे चौकार-षटकार तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहेत. रोहितच्या पुनरागमनाची तारीख समोर आली आहे.

भारतीय संघाचा वनडे कर्णधार शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये खेळला होता. म्हणजेच फेब्रुवारीपासून हिटमॅनची तुफानी फलंदाजी फॅन्सना मिस करावी लागत होती. रोहित आधीच टी-20 आणि टेस्ट क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे आणि आता तो फक्त वनडेत रंगतदार खेळताना दिसणार आहे.

रोहित शर्माबाबत रेवस्पोर्ट्सची ताजी माहिती अशी आहे की हिटमॅन ऑस्ट्रेलिया-ए विरुद्ध होणाऱ्या अनौपचारिक वनडे मालिकेत खेळताना दिसणार आहे. ऑस्ट्रेलिया-ए सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान भारताच्या दौर्‍यावर येणार आहे. दोन टेस्ट सामने खेळल्यानंतर कांगारू संघ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत सहभागी होणार आहे.

एकदिवसीय मालिकेत रोहितही फलंदाजीने धडाका दाखवताना दिसणार आहे. मालिकेचा पहिला वनडे सामना 30 सप्टेंबरला खेळला जाणार आहे, तर दुसरा सामना 3 ऑक्टोबरला होईल. त्याचवेळी शेवटचा सामना 5 ऑक्टोबरला रंगणार आहे. वनडे मालिकेतील सर्व सामने कानपूर येथे खेळले जाणार आहेत.

रोहित शर्मा भारतीय संघाच्या जर्सीत शेवटचा खेळताना यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात दिसला होता. हिटमॅनने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात फलंदाजीने जबरदस्त खेळ केला होता आणि तो “मॅन ऑफ द मॅच” ठरला होता. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने तब्बल 12 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले होते. मात्र, टी-20 मधून आधीच निवृत्ती घेतलेल्या रोहितने आयपीएल 2025 दरम्यान टेस्ट क्रिकेटलाही अलविदा केले होते.

Comments are closed.