अरुणाचलमध्ये एचआयव्ही रॅकेट

दोन कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येनंतर आयएएस अधिकारी फरार

सर्कल/एटानगर

अरुणाचल प्रदेशात आत्महत्येच्या दुहेरी प्रकरणात आयएएस अधिकारी तालो पोटोम विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. 23 ऑक्टोबर रोजी एका 19 वर्षीय युवकाने लैंगिक शोषणाचा आरोप करत आत्महत्या केली होती. दिल्ली सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव म्हणून तैनात पोटोम सध्या फरार आहेत. पोटोम यांच्यामुळेच युवकाने आत्महत्या केली होती, असे त्याच्या परिवाराचे सांगणे आहे.

19 वर्षीय युवकासोबत ग्रामीण कार्य विभागातील एका इंजिनियरने स्वत:वर गोळी झाडून घेतली होती. लैंगिक शोषण करण्यासोबत फसवणूक करण्यात आल्याचा दावा पीडिताने केला होता. जाणूनबुजून मला एचआयव्ही पॉझिटिव्ह करण्यात आले आणि मग ब्लॅकमेल करण्यात आल्याचा दावा इंजिनियरने एका अधिकाऱ्यावर केला होता.

त्याने स्वत:च्या सुसाइड नोटमध्ये तालो पोटोम यांनाही जबाबदार ठरविले होते. जर त्यांनी मला या पदावर नियुक्त केले नसते, तर मला आत्महत्या करावी लागली नसती असे त्याने सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एसआयटी स्थापन केली आहे. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधातील आरोपांची चौकशी अणि आत्महत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे. पोटोम यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आत्महत्या करणाऱ्या इंजिनियरने देखील स्वत:च्या सुसाइड नोटमध्ये एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे नमूद केले होते. आता उत्तरीय तपासणी अहवालाची प्रतीक्षा आहे. पोटोम यांच्या अटकेनंतर त्यांचीही एचआयव्ही चाचणी करविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

 

Comments are closed.