हॉकीच्या बादशहांना 11 लाखांची सलामी

जपानच्या मैदानावर तिरंगा फडकवून आशियाई हॉकीचा मुकुट पुन्हा डोक्यावर चढवणाऱ्या हिंदुस्थानी पुरुष संघाला आता बक्षिसांची सलामी मिळणार आहे. मलेशियाला तब्बल 5-1 ने चिरडत सलग दुसऱ्यांदा आशियाई सुवर्णपदकावर नाव कोरणाऱ्या संघातील प्रत्येक खेळाडूला हॉकी इंडिया 11 लाख रुपयांचे रोख पारितोषिक देणार आहे. सपोर्ट स्टाफलाही प्रत्येकी 5.5 लाख रुपयांची शाबासकीची थाप मिळणार आहे.

हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिकाa यांनी संघाच्या ऐतिहासिक कामगिरीचे तोंडभरून काwतुक केले. 2022 मध्ये जपानला 5-1 ने नमवत सुवर्ण जिंकले होते. यंदा मलेशियावरही 5-1 चा दणदणीत विजय मिळवत हिंदुस्थानने आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष हॉकीच्या सुवर्णाचा प्रथमच यशस्वी बचाव केला. हे हिंदुस्थानचे आशियाई स्पर्धेतील पाचवे पुरुष हॉकी सुवर्ण ठरले.

यंदा हॉकीची कामगिरी फक्त पुरुषांच्या सुवर्णापुरती मर्यादित नाही. पुरुष आणि महिला-दोन्ही संघांनी एकाच आशियाई स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला.

Comments are closed.