SA vs WI: कॅरेबियन जोडीचा धमाका! होल्डर आणि शेफर्डने मोडला विश्वविक्रम; टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास

आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 मध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज (South Africa vs West Indies) यांच्यात सुपर-8 चा अत्यंत महत्त्वाचा सामना खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिजची अवस्था एकवेळ 7 बाद 83 अशी बिकट झाली होती. मात्र, त्यानंतर जेसन होल्डर (Jason Holder & Romario shepherd) आणि रोमारियो शेफर्ड या जोडीने डावाची सूत्रे हाती घेत संघाला 20 षटकांत 176 धावांपर्यंत पोहोचवले.
वेस्ट इंडिजला या सन्मानजनक धावसंख्येवर पोहोचवण्यासाठी होल्डर आणि शेफर्ड यांनी 8 व्या विकेटसाठी 89 धावांची विक्रमी भागीदारी केली. या भागीदारीसह त्यांनी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील 11 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला आहे. यापूर्वी 8 व्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारीचा विक्रम स्कॉटलंडच्या प्रेस्टन मोमसेन आणि सफयान शरीफ (80 धावा, विरुद्ध नेदरलँड्स, 2015) यांच्या नावावर होता.
जेसन होल्डरने 48 धावांची खेळी केली, तर रोमारियो शेफर्डने 52 धावांचे योगदान दिले. त्यांच्या या खेळीमुळे वेस्ट इंडिजला सामन्यात टिकून होता. पण त्यानंतर आफ्रिकेने त्यांना चांगलाच धक्का दिला.
आंतरराष्ट्रीय टी-20: 8 व्या किंवा त्याखालील विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी
सबेर जखिल आणि सकलैन अली (बेल्जियम) 132 ऑस्ट्रेलिया 2021
रोमारियो शेफर्ड आणि जेसन होल्डर (वेस्ट इंडिज) 89 दक्षिण आफ्रिका 2026
चेर्नोह बाह आणि लांसाना लामिन (सेरा लिओन) 88 एस्वातिनी 2024
प्रेस्टन मोमसेन आणि सफ्यान शरीफ (स्कॉटलंड) 80 नेदरलँड्स 2015
रोमारियो शेफर्ड आणि शमर स्प्रिंगर (वेस्ट इंडिज) 78 न्यूझीलंड
Comments are closed.