धुळवड स्पेशल! चिकन-मटणाच्या दुकानाबाहेर खवय्यांची गर्दी, अर्धा किलोमीटरपर्यंत रांगा

देशभरात होळीची धूम असून गुरुवारी मोठ्या उत्साहात होलिकादहन करण्यात आले. आज धुळवड असून ठिकठिकाणी रंगांची उधळण सुरू आहे. एकीकडे रंगांची बरसात होत असताना दुसरीकडे शुक्रवार असल्याने चिकन, मटणावर ताव मारणाऱ्या खवय्यांनी चिकन-मटणाच्या दुकानाबाहेर गर्दी केली आहे.
होळीच्या दुसऱ्या दिवशी अर्थात धुळवडीला अनेक घरांमध्ये चिकन-मटणाचा बेत केला जातो. त्यात आज शुक्रवारही आल्याने खवय्यांची चंगळच झाली आहे. त्यामुळे सकाळपासून चिकन-मटणाच्या दुकानाबाहेर खवय्यांनी गर्दी केली आहे. अनेक ठिकाणी तर अर्धा-एक किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत.
खरेदीसाठी रांगा लागल्याचे पाहताच मटणानेही चांगलाच भाव खाल्ला आहे. मुंबई-ठाण्यामध्ये मटण 840ते 880 रुपये किलो मिळत आहे. तर ग्रामीण भागात मटणाचा भाव 740 ते 780 रुपये किलो आहे. भाव वाढलेला असला तरी मांसाहाराच बेत तडीस न्यायचाच असे म्हणत खवय्यांनी दुकानांच्या बाहेर रांगा लावल्या आहेत.
Comments are closed.