देश विदेश – 43 लाख विद्यार्थ्यांसाठी 15,649 परीक्षा केंद्रे

मध्यवर्ती माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)च्या दहावी आणि बारावीची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. यंदा दहावी आणि बारावीचे एकूण विद्यार्थी 43 लाखांहून जास्त असून ही परीक्षा देशातील 15 हजार 649 केंद्रावर होत आहे. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, 10 वीच्या परीक्षेसाठी 25,08,319 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये 14,08,546 मुले तर 10,99,773 मुलींचा समावेश आहे. 12 वीमध्ये 18,59,551 मुलांनी नोंदणी केली असून 10,27,552 मुले तर 8,31,999 मुलींचा समावेश आहे. देशात 15,659 केंद्र असून 10 वीसाठी 8,075 तर 12 वीसाठी 7,574 केंद्र बनवले आहेत.

अमेरिकेत हॉकी चेहरा सुरू असतानाच गोळीबार, दोघे ठार

अमेरिकेतील रोड आयलंडमध्ये हायस्कूलमधील हॉकी सामना सुरू असताना केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात हल्लेखोरांसह तीन जणांचा मृत्यू झाला असून अन्ये तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या गोळीबारामागे कौटुंबिक वाद असू शकतो, असे पोलिसांनी म्हटले आहे. गोळीबार झाला त्यावेळी मैदानात दोन्ही संघ समोरासमोर होते. या संघांमध्ये आसपासच्या अनेक शाळांमधील खेळाडूंचा समावेश होता. तसेच सामना पाहण्यासाठी कुटुंबातील व्यक्तीही आली होती. सगळीकडे आनंदाचे वातावरण असताना अचानक गोळीबार करण्यात आला.

पोलिसांवर हल्ला करत जम्मूतून च्या 3दिले पळाले

जम्मूमधील आरएस पुरा सेक्टरमधील बाल निरीक्षणगृहातून 3 कैदी पळून गेले. या कैद्यांनी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. बाल निरीक्षणगृहामध्ये देखरेखीमध्ये निष्काळजीपणा झाल्याने 6 पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. या घटनेचे सीसी टीव्ही फुटेज समोर आले असून यात स्पष्टपणे दिसतेय की, एका कैद्याच्या हातात पिस्तूल दिसत आहे. परंतु ही पिस्तुल कुठून आली आणि किती गोळ्या झाडल्या, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

गुजरातमध्ये तब्बल 200 किलो ड्रग्ज जप्त; दोन तस्करांना अटक

गुजरात एटीएस आणि भारतीय तटरक्षक दलाने संयुक्त मोहीम राबवून समुद्रात एका मोठय़ा अंमली पदार्थांच्या तस्करीच्या मुसक्या आवळल्या आहेत. संयुक्तपणे राबवलेल्या मोहिमेत मासे पकडणाऱया एका बोटीतून हे 200 किलोचे ड्रग्ज आणले जात होते. हे ड्रग्ज इराणहून आणले होते. याप्रकरणी दोन तस्करांना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचा तपास करण्यासाठी हे ड्रग्ज पोरबंदरला आणण्यात आले आहे, असे एटीएसने सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून गुजरात हे ड्रग्जचा अड्डा बनल्याचे चित्र आहे. तस्कर रोखण्यात पोलिसांना आणि एटीएसला यश आले आहे.

'तेहरान' सीरिजच्या निर्मात्या दाना edencha संशयास्पद मृत्यू

इस्रायलच्या प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या डाना ईडन यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्या ग्रीसची राजधानी एथेंन्समधील एका हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळल्या आहेत. त्यांच्या शरीरावर जखमा दिसत आहेत. थ्रिलर सीरिज ‘तेहरान’ बनवल्यानंतर त्यांना इंटरनॅशनल एमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी आत्महत्या केल्याचा दावाही केला जात आहे. परंतु घटनास्थळी मिळालेल्या काही पुराव्यावरून हा मृत्यू संशयास्पद दिसत आहे. पोलिसांनी त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे.

Comments are closed.