देश विदेश – एसबीआयमध्ये 2273 पदांची भरती
राज्य बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयमध्ये सर्कल बेस्ड ऑफिसरच्या एकूण 2 हजार 273 पदांसाठी भरती केली जात आहे. या पदासाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख 25 फेब्रुवारी 2026 आहे. याआधी ही तारीख 18 फेब्रुवारी होती. परंतु ही तारीख आता वाढवण्यात आली आहे.
या भरतीसंबंधी सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर देण्यात आली आहे. महाराष्ट्रात 194 तर मुंबई मेट्रोमध्ये 143 जागा भरल्या जाणार आहेत. उर्वरित जागा वेगवेगळ्या राज्यातील आहेत. यात गांधीनगर 194, चंदिगड 103, नवी दिल्ली 76, चेन्नई 165, भोपाळ 97, जयपूर 103, लखनौ 200 जागा भरल्या जाणार आहेत.
रशियाच्या 'इलेक्ट्रो l ५' उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
रशियाची अंतराळ संस्था रोस्कॉसमॉसने कझाकस्तानातील बैकोनूर कॉस्मोड्रोमवरून प्रोटॉन एम रॉकेटने ‘इलेक्ट्रो-एल-5’ या हवामान उपग्रहाने यशस्वीपणे अवकाशात प्रक्षेपण केले. हा उपग्रह 24 तास, उच्च-रिझोल्युशन पृथ्वी देखरेख आणि डेटा रिलेसाठी डिझाइन करण्यात आला आहे. बैकोनूर कॉस्मोड्रोमच्या साइट 81/24 वरून हे प्रक्षेपण झाले. ब्लॉक डीएम-03 अप्पर स्टेज आणि पेलोड्सना घेऊन रॉकेट जिओस्टेशनरी कक्षेत पोहोचले. उपग्रहासोबत ओसीएचआर नावाचा दुय्यम उपग्रहही होता. डिसेंबर 2025 मध्ये अप्पर स्टेजमधील त्रुटींमुळे हे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले होते.
पाकिस्तानात 'दिग्गज'ची पायरेटेड कॉपी 16 रुपयांत
'दिग्गज'ची क्रेझ जगभरात पाहायला मिळत आहे. या चित्रपटावर पाकिस्तानात बंदी घातली आहे. परंतु, पायरेटेड कॉपीची सर्रास विक्री होत असून अवघ्या 16 रुपयांत बाजारात विकली जात आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाला ओटीटी प्लॅटफॉर्म्स नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आले आहे. न्यूझीलंडचा एक ब्लॉगर कार्ल रॉकने नुकताच यूटय़ुबवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत स्पष्टपणे दिसते की, कराचीच्या रेनबो सेंटरमध्ये ‘धुरंधर’ची पायरेटेड कॉपीची सर्रास विक्री केली जात आहे. पायरेटेड कॉपी 50 पाकिस्तानी म्हणजे हिंदुस्थानातील केवळ 16 रुपये आहे.
नेदरलँडमध्ये ६० दशलक्ष
ग्राहकांचा डेटा चोरीला
नेदरलँडची टेलिकॉम पंपनी ओडिडोवर सायबर हल्ला झाला आहे. हॅकर्सने सिस्टमध्ये घुसून 60 लाखांहून अधिक ग्राहकांचा खासगी डेटा चोरला आहे. हा डेटा खूपच संवेदनशील आहे. यामध्ये लोकांच्या बँकेच्या खात्याची माहिती आणि पासपोर्ट नंबर्सचा समावेश आहे. नेदरलँडमध्ये आतापर्यंतचा हा सर्वात मोठी सायबर हल्ला आहे. पंपनीने ग्राहकांना यासंबंधीची माहिती पाठवली असून तपास सुरू केला आहे. तपास पूर्ण होईपर्यंत ग्राहकांनी कोणत्याही संशयित ई-मेलवर किंवा मेसेजला उत्तर देऊ नये, असे आवाहन केले आहे. ग्राहकांनी आपल्या बँक खात्यावर लक्ष ठेवावे, अशा सूचनाही टेलिकॉम पंपनीने दिल्या आहेत.
Comments are closed.