देश  विदेश बातम्या – अमेरिकेच्या संसद भवनवर हल्ल्याचा प्रयत्न; एकाला अटक

अमेरिकेच्या संसद भवानवार हल्ल्याचा प्रयत्न; एकाला अटक

अमेरिकेचे संसद भवन (यूएस कॅपिटल) वर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणाला पोलिसांनी तत्काळ अटक केली. जॉर्जियाचा रहिवासी असलेला कार्टर कामाचो असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. हा तरुण लोअर वेस्ट टेरेसच्या दिशेने शस्त्र घेऊन जात असताना डय़ुटीवर तैनात असलेल्या अधिकाऱयांनी त्याला पकडले. त्याच्या वाहनात शॉटगन, हेलमेट, गॅस मास्क, अतिरिक्त दारूगोळा सापडला आहे. पोलिसांनी या सर्व वस्तू जप्त करून त्याला अटक केली आहे.

निवड होऊनही CAPFCHE ४५० अधिकारी बिनपगारी

मध्यवर्ती सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) मधील सहायक कमांडेंट पदावर निवड होऊनही 450 उमेदवार हे गेल्या 8 महिन्यांपासून बिनपगारी आहेत. लेखी परीक्षा, मेडिकल होऊनही त्यांना अद्याप नियुक्ती मिळाली नाही. नियुक्ती प्रक्रिया नोडल इंडो तिबेट पोलिसातील आहे. आयटीबीपीच्या म्हणण्यानुसार, यासंबंधीचे अंतिम निर्देश गृह मंत्रालयाकडून येणे बाकी आहे. त्यानंतर पुढची कारवाई केली जाईल.

12 वर्षांच्या सेवेनंतर अॅमेझॉनने कामावरून काढले

अॅमेझॉनने सॉफ्टवेअर इंजिनीअर आणि टेक मॅनेजर यासारख्या मोठय़ा पदांवर 12 वर्षांपासून काम केलेल्या कर्मचाऱ्याला कामावरून काढले. हेमंत विरमानी असे या कर्मचाऱयाचे नाव असून ते मूळचे हिंदुस्थानचे आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून ते वॉशिंग्टनमध्ये राहतात. हेमंत यांनी कंपनीत वरिष्ठ मॅनेजर, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट पद सांभाळले होते.

अफगाणिस्तानने तीन पाकिस्तानी सैनिक सोडले

अफगाणिस्ताने मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये पकडलेले तीन पाकिस्तानी सैनिक सोडले आहेत, अशी माहिती अफगाणिस्तान सरकारमधील प्रवत्ते जबिहुल्लाह मुजाहिद यांनी दिली आहे. 12 ऑक्टोबरला झालेल्या लढाईत पकडलेले पाकिस्तानचे तीन सैनिक सौदी प्रतिनिधी मंडळाकडे सोपवले होते. ऑक्टोबरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे.

Comments are closed.