Hongkong Flight Accident – विमान धावपट्टीवरुन घसरुन समुद्रात पडले, दोघांचा मृत्यू

हॉंगकॉंगच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी एक दुर्देवी अपघात घडला आहे. एमिरेट्स एअरलाइनचे बोईंग 747 कार्गो विमानाचे लॅण्डिंग दरम्यान नियंत्रण सुटले आणि धावपट्टीवरुन घसरुन थेट समुद्रात पडले. यात दोघांचा मृत्यू झाला.

तुर्की मालवाहू एअरलाइन एअर एसीटीच्या मालकीचे हे विमान एमिरेट्सचे फ्लाईट EK9788 होते. स्थानीक पोलिसांच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला. ज्यापैकी एक एअरपोर्ट कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले. तसेच विमानात असलेल्या चारही क्रू मेंबर्सना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही दुर्घटना सकाळी 3.50 वाजता घडली, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, विमान धावपट्टीवर उतरताच ते तिथे उभ्या असलेल्या गस्ती वाहनाशी आदळले. धडक इतकी जोरदार होती की वाहन समुद्रात पडले आणि काही क्षणातच विमान धावपट्टी ओलांडून पाण्यात बुडाले.

फ्लाइट ट्रेकिंग वेबसाइट Flightradar24 नुसार, फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट Flightradar24 वरील माहितीनुसार, टक्कर झाली तेव्हा विमान अंदाजे ताशी 90 किलोमीटर वेगाने प्रवास करत होते. AirNavRadar ने जारी केलेल्या फोटोंमध्ये विमानाचा शेपटीचा भाग पूर्णपणे गायब असल्याचे दिसून आले आहे, तर उर्वरित विमान अर्धे बुडालेले दिसते.

हे विमान अंदाजे 32 वर्षे जुने होते आणि ते तुर्की कार्गो कंपनी एअरएसीटी द्वारे एमिरेट्ससाठी चालवले जात होते. हे कार्गो विमान दुबई अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करत होते आणि त्यात कोणतेही प्रवासी नव्हते, फक्त चार क्रू मेंबर्स असल्याचे बोलले जातेय.

Comments are closed.