शेवटही पराभवानेच, टीम इंडियाची पुन्हा नामुष्की! पाकिस्तान सोडून सगळ्यांकडून हरले; लिंबूटिंबू सं
टीम इंडियाचा श्रीलंकेविरुद्ध पराभव : हाँगकाँग सिक्सेस क्रिकेट स्पर्धेत भारताचा प्रवास निराशाजनक ठरला. दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध विजयाने स्पर्धेला शानदार सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर संघाची कामगिरी घसरत गेली आणि सलग चार सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाला श्रीलंका, कुवेत, यूएई आणि नेपाळकडून अनपेक्षित हार पत्करावी लागली. सलग पराभवानंतर टीम इंडियाचे सेमीफायनलचे स्वप्न भंगले. भारतीय गोलंदाजांनी सातत्य राखण्यात अपयश आले, तर फलंदाजांनीही निराशाजनक प्रदर्शन केले.
भारत आणि श्रीलंका यांच्यात हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत रंगलेल्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियासाठी अत्यंत निराशाजनक ठरला. 6-6 षटकांच्या सामन्यात भारतीय संघाचा नशिब साथ देऊ शकला नाही. प्रथम गोलंदाजी करताना भारतीय खेळाडूंनी निराशा केली आणि जेव्हा लक्ष्याचा पाठलाग करण्याची वेळ आली, तेव्हा श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज अक्षरशः कोसळले. हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत भारताने केवळ पाकिस्तानविरुद्धच विजय मिळवला, तर उर्वरित सर्व संघांनी भारताला पराभवाची चव चाखवली. श्रीलंकेने या सामन्यात तब्बल 48 धावांनी विजय मिळवला.
श्रीलंकेसमोर भारताची शरणागती पत्करली
हा सामना मोंग कोक येथील मिशन ग्राउंडवर खेळवण्यात आला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत फक्त 6 षटकांत 138 धावा फटकावल्या. लाहिरू समरकून आणि लाहिरू मधुशंका यांनी अर्धशतके झळकावली. दिनेश कार्तिकच्या अनुपस्थितीत स्टुअर्ट बिन्नीने भारतीय संघाचे नेतृत्व केले, मात्र कोणत्याही भारतीय गोलंदाजाची इकॉनॉमी 20 धावांखाली राहिली नाही.
139 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी पुन्हा कोलमडली. भरत चिपलीने 13 चेंडूंमध्ये 41 धावांची झुंजार खेळी केली, पण बाकी कोणीच साथ देऊ शकले नाही. भारताचा डाव 6 षटकांत फक्त 90 धावांवर संपला. लाहिरू समरकूनने 2 आणि लाहिरू मदुशंकाने 1 बळी घेतला.
हाँगकाँग सिक्सेस 2025 – भारताची कामगिरी
हाँगकाँग सिक्सेस 2025 स्पर्धा भारतीय संघासाठी एका भयानक स्वप्नासारखी ठरली. पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना जिंकूनही संघ पुढील चार सामने हरला. कुवेत, यूएई, नेपाळ आणि आता श्रीलंकेने भारताचा पराभव केला.
भारताचे सर्व सामने आणि निकाल :
7 नोव्हेंबर 2025 भारत विरुद्ध पाकिस्तान – भारताने DLS पद्धतीने 2 धावांनी विजय मिळवला
8 नोव्हेंबर 2025 कुवैत विरुद्ध भारत – कुवेतने 27 धावांनी विजय मिळवला
8 नोव्हेंबर 2025 भारत विरुद्ध यूएई- यूएईने 4 विकेट्सने विजय मिळवला
8 नोव्हेंबर 2025 नेपाळ विरुद्ध भारत – नेपाळने 92 धावांनी विजय मिळवला
9 नोव्हेंबर 2025 श्रीलंका विरुद्ध भारत – श्रीलंकेने 48 धावांनी विजय मिळवला
एकूणात, पाकिस्तानविरुद्धचा एकमेव विजय सोडला, तर भारताने बाकी सर्व सामन्यांत पराभव पत्करला. हाँगकाँग सिक्सेस 2025 स्पर्धा भारतीय संघासाठी विसरण्यासारखी ठरली आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.