Ratnagiri News – राजापूर पोलीस ठाणे हद्दीत वाकेड ब्रिजवर भीषण अपघात; दोन जण जखमी, वाहतूक सुरळीत
राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाकेड ब्रिजवर एक अपघात झाल्याची घटना घडली आहे. अपघाताची माहिती मिळताच वाकेड पोलीस मदत केंद्राचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात दोन जण जखमी झाले असून, पोलिसांनी तत्परता दाखवत ॲम्बुलन्सच्या साहाय्याने त्यांना उपचारासाठी तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. आज सकाळी 7:30 च्या सुमारास हा अपघात झाला.
अपघातानंतर घटनास्थळी झालेली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांनी तात्काळ पावले उचलली. अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला काढून घेण्यात आली असून, सध्या या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे सुरळीत सुरू आहे.
Comments are closed.